Pune City
Pune CityTendernama

Pune: महागड्या कोरेगाव पार्कला 'हा' भाग लवकरच मागे टाकणार?

पुणे (Pune) : रेडीरेकनर (Ready Reckoner) ‘जैसे थे’ ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशामुळे कोरेगाव पार्कचा (Koregaon Park) पुणे शहरातील सर्वाधिक दर असलेल्या भागाचा मान कायम राहिला आहे. विधी महाविद्यालय (विष्णूशास्त्री चिपळूणकर) रस्त्यालगत असलेला कांचन गल्ली, अशोकपथ परिसर दुसऱ्या क्रमांकावर, तर प्रभात रस्त्यावरील काशिनाथ शास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक १५) तिसऱ्या क्रमांकाचा महागडा परिसर ठरला आहे. पेठांमध्ये सदाशिव पेठ/नवी पेठांचा दर ९०५२ इतर आहे.

Pune City
Good News: रेडी रेकनर दर जैसे थे; बांधकामक्षेत्राला सरकारचा दिलासा

मेट्रो प्रकल्पामुळे पौड रस्ता आणि कर्वे रस्ता या परिसरातील दरातील तेजी कायम राहिली आहे.
कोरेगाव पार्क आणि प्रभात रस्ता हा पुणे शहरातील उच्चभ्रू भाग म्हणून ओखळला जातो. त्यामुळे या भागातील रेडीरेकनरमधील दर कायमच जास्त असतात. कोरेगाव पार्कमधील रेल्वे उड्डाण पूल (ओव्हर ब्रीज) ते बंडगार्डन पूल हा भाग दरामध्ये पहिल्या स्थानावर असतो. या भागातील दर प्रतिचौरस फूट १६ हजार ३९ रुपये आहे.

विधी महाविद्यालय रस्त्यालगत असलेल्या कांचनगल्ली, अशोकपथ परिसरात हे दर १५ हजार २८८ रुपये, तर प्रभात रस्त्यावरील काशिनाथ शास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक १५) या भागातील दर १४ हजार ३१२ रुपये प्रतिचौरस फूट आहेत. आयकर रस्त्यावरील दर हे १३ हजार ७१८ रुपये प्रतिचौरस फूट आहेत. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गात मेट्रो मार्गालगत असलेल्या प्रभाग रस्ता, विधी महाविद्यालय रस्त्यांबरोबरच कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरील तेजी कायम राहिली आहे.

Pune City
Mumbai-Goa Highway: 'तो' बोगदा 2 महिन्यात खुला होणार

कर्वे रस्त्यावरील दर १३ हजार ८३५ रुपये, तर पौड रस्त्यावरील दर प्रतिचौरस फूट ११ हजार ४८५ रुपये आहेत. कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी ते गरवारे महाविद्यालयापर्यंतचे दर १२ हजार ८३० रुपये आहेत.

पुण्यातील प्रमुख भागांतील दर
परिसर-दर (प्रतिचौरस फूट)
- कोथरूड ११४८५
- बाणेर-११३०१
- पर्वती-११२३०
- बालेवाडी-९३३०
- पाषाण-९०४१
- बिबवेवाडी-८०५२
- हडपसर-७७६७
- वडगाव खुर्द-७५०८
- वारजे-७३४०
- हिंगणे खुर्द ६८६९
- सिंहगड रस्ता ६६०९
- कात्रज- ६,४२०
- उंड्री- ६४०९
- वडगाव बुद्रुक ६०७४
- आंबेगाव बुद्रुक ५९३१
- आंबेगाव खुर्द ५१६६
- धनकवडी ५५००
- शिवणे -४३६०

Pune City
Mumbai : 1700 कोटींपैकी सुशोभीकरणाची 50 टक्के कामे पूर्ण

मध्यवर्ती पेठांतील दर (प्रतिचौरस फूट)
सदाशिव पेठ/नवी पेठ-९०५२
नारायण पेठ-८२६३
शनिवार पेठ-८७४४
बुधवार पेठ-८५६५
मंगळवार पेठ-८१६९
सोमवार पेठ-७६५३
शुक्रवार पेठ-७५७०
गुरुवार पेठ-७०२७
कसबा पेठ-६७२०
रास्ता पेठ-६६१८
गंजपेठ-६०६६
रविवार पेठ-६०५५
नाना पेठ-६०८६

पुण्यातील दहा वर्षांतील दरवाढ
वर्ष - दर टक्क्यांत

- २०११-१२ - १८ टक्के
- २०१२-१३ - ३७ टक्के
- २०१३-१४ -२७ टक्के
- २०१४-१५ - २२ टक्के
- २०१५-१६ - १४ टक्के
- २०१६-१७ - ७ टक्के
- २०१७-१८ - ५.३० टक्के
- २०१८-१९ - वाढ नाही
- २०१९-२० - वाढ नाही
- २०२०- २१ - १.७४ टक्के
- २०२१-२२ - वाढ नाही
- २०२२-२३ - ५ टक्के
- २०२३-२४- वाढ नाही

Pune City
Nashik : 'PWD'त ठेकेदारांकडून होणाऱ्या टोल वसुलीचा व्हिडिओ व्हायरल

दरवर्षी एक एप्रिलपासून राज्यात रेडीरेकनरचे नव्याने दर लागू होतात. परंतु सरकारने मार्गील वर्षीचे दर पुढील वर्षातही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आदेश काढण्यात आले.
- श्रावण हर्डीकर, नोंदणी महानिरीक्षक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com