PMRDA
PMRDATendernama

Pune : पुणे महापालिकेने पीएमआरडीएला का दिला दणका? 'ती' चूक भोवली

Published on

पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो व उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तसेच, उड्डाणपुलाचे गर्डर बसविताना महापालिकेने (PMC) बांधलेली सीमा भिंत पडल्याने पुणे पालिकेने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए - PMRDA) नुकसान भरपाईची रक्कम वसूल करताना तीनपट दंड लावला आहे. तेरा लाख ७० हजार रुपयांची रक्कम पालिकेकडे जमा करावी, असे पत्र पाठवले आहे.

PMRDA
10 हजार कोटींच्या ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात अजितदादांची दमदार एन्ट्री; ॲग्रीमेंट रोखले! हणमंतराव गायकवाड, सुमित साळुंखे फसले?

पीएमआरडीएतर्फे गणेशखिंड रस्त्यावर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू आहे. त्याचवेळी आचार्य आनंदऋषिजी महाराज चौक (पुणे विद्यापीठ चौक) येथे दुमजली उड्डाणपूलही उभारला जात आहे.

या रस्त्यावरची वाहतूककोंडी कमी करण्यासाठी रस्ता ४५ मीटर रुंदीचा करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. नानावटी बंगला ते आरबीआय दरम्यान दोन्ही बाजूस रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या कामाची पथविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. त्यात पीएमआरडीएकडून उड्डाणपुलाचे गर्डर टाकताना अती अवजड क्रेनचा वापर केला.

गर्डर टाकताना क्रेनची वाहतूक झाली. तसेच, क्रेन पादचारी मार्गावर उभा करण्यात आला. त्यामुळे एबीआयएल हाऊस, आनंद मोहिते, उज्ज्वल मोहिते यांची मिळकत, एनएच ढाबा याठिकाणी पदपथ, केबल डक्ट, डीडब्ल्युसी पाइप, कॅरजवे, सीमाभिंत इत्यादीचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी क्रेनमुळे पादचारी मार्ग पूर्णपणे खचला. एनएच ढाबा येथे नव्याने तयार केलेल्या डब्ल्युएमएमवर माती टाकली असल्यामुळे रस्त्याचा सब बेस खराब झाला आहे.

PMRDA
शिंदे सरकारच्या 'त्या' निर्णयामुळे छोट्या कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी; न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

गणेशखिंड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम पीएमआरडीएकडून सुरू असल्याने त्यांच्याकडूनच रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. पण, याठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांकडून महापालिकेवर टीका केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी पाहणी केली असता, त्यांना त्यावेळी पीएमआरडीएकडून नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.

कोणकोणता दंड?

सीमा भिंतीचा खर्च १३ हजार २३६, पादचारी मार्ग २ लाख ७५ हजार ९९१, एनएच ढाबा कलव्हर्ट ८० हजार ७००, एबीआयएल हाऊस ७५ हजार ३८, आनंद मोहिते मिळकत १२ हजार रुपये असे एकूण ४ लाख ५६ हजार ९६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यावर तीनपट दंड लावून १३ लाख ७० हजार ८९७ रुपये भरण्यास सांगितले.

PMRDA
Nagpur : फडणवीस, गडकरींच्या नागपुरात चाललंय काय? 600 कुटुंबांचे घराबाहेर पडनेही का झाले मुश्किल?

गुन्हा दाखल करण्याचा इशारा...

मेट्रो व उड्डाणपुलाचे काम करताना पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणे यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल का करण्यात येऊन नये, अशी नोटीस महापालिकेने गणेशखिंड रस्त्यावर पीएमआरडीएतर्फे काम करणाऱ्या कंपनीला बजावली. तीन दिवसात यावर खुलासा करण्याचे आदेश पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिले.

Tendernama
www.tendernama.com