Pune : कोरेगाव पार्कातील 'या' रस्त्यावर पालिकेने मध्यरात्रीच का केली वृक्षतोड?

Trees
TreesTendernama

पुणे (Pune) : पुणे शहरात मनमानी पद्धतीने पुणे महापालिका (PMC) वृक्षतोड करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिक करत असून, यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल आहे. असे असताना दुसरीकडे महापालिकेने कोरेगाव पार्क (Koregaon Park) येतील नॉर्थ मेन रोड हा रुंद करण्यासाठी मध्यरात्री यंत्रणा कामाला लावून वृक्षतोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जागरूक महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

Trees
Nashik : पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्थानिक वाहनांची सवलत रद्द; वाहनचालकांमध्ये...

पुणे महापालिकेतर्फे कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रियाही राबविण्यात आली आहे. लेन क्रमांक सात ते कल्याणीनगर पूल या दरम्यानचा रस्ता सध्या १८ मीटर आहे, हा रस्ता २४ मीटर रुंद केला जाणार असून, दोन्ही बाजूने प्रत्येकी तीन मीटरचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे ८० झाडे काढली जाणार आहेत.

गुरुवारी (ता. १४) मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास या रस्त्यावर वृक्षतोड सुरू असल्‍याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत होता. त्यामुळे काही नागरिकांनी तेथे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे जाऊन चौकशी केली. त्यांच्याकडे परवानग्या असल्या तरी रात्रीच्या वेळी झाड तोडण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार केली.

Trees
आदिवासी विकास विभाग: फर्निचर खरेदीत 62 कोटींचा घोटाळा; लेखा परीक्षणात ठपका

नॉर्थ मेन रोडच्या रुंदीकरणासाठी वृक्षतोड सुरू असताना तेथे महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता, तसेच रात्रीच्या वेळी वृक्षतोड करण्यास बंदी असतानाही हे काम करण्यात आल्याने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नॉर्थ मेन रोड अर्धवटच रुंद केला जाणार आहे. झाडे तोडून हा रस्ता रुंद करण्याऐवजी महापालिकेने इतर उपाययोजना करणे आवश्‍यक होते.

- विजया सुरतकर, तक्रारदार

नॉर्थ मेन रोड सध्या १८ मीटर रुंद असून, तो २४ मीटर रुंद केला जाणार आहे. दिवसभर वाहतूक असल्याने वृक्षतोड करता येत नसल्याने हे काम रात्रीच्या वेळी करण्यात आले आहे. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात रामटेकडी येथील औद्योगिक परिसरामध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे.

- अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com