Pune : 'त्या' 50 हजार ग्राहकांना महावितरणने का दिला 'जोर का झटका'?

वीजबिल न भरल्याने महावितरणची कारवाई; ५० हजारांवर ग्राहकांचे कनेक्शन कट
Power
PowerTendernama

पुणे (Pune) : वारंवार आवाहन करूनही वीजबिलाचा भरणा न केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सर्व प्रकाराच्या वर्गवारीतील १७ लाख ८५ हजार वीजग्राहकांकडे ३३२ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेंतंर्गत महावितरणकडून ३५ दिवसांमध्ये ५० हजार १३६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला.

Power
Good News : शेतकऱ्यांनो आता तुमच्यासाठी बनणार पाणंद रस्ते; 70 कोटींचा निधी

पुणे प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक घरगुती १५ लाख ८६ हजार ग्राहकांकडे २२१ कोटी ६३ लाख रुपये, तसेच वाणिज्यिक एक लाख ६५ हजार ग्राहकांकडे ६७ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ३३ हजार औद्योगिक ग्राहकांकडे ४३ कोटी ७६ लाख रुपयांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणने वसुली मोहिमेला वेग दिला आहे.

आवाहन किंवा विनंती करूनही जे थकबाकीदार थकीत वीजबिलांची रक्कम भरण्यास दाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

महावितरणकडून नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी करण्यात येत आहे. शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणांहून विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्यानुसार कारवाई करू, असेही ते म्हणाले.

Power
Sambhajinagar : संभाजीनगरकरांना रेल्वेने दिली Good News! पुढील 30 महिन्यांत...

अशी आहे थकबाकी

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (ता. ६) मंगळवारपर्यंत (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- २०९ कोटी ३६ लाख रुपये (८,५८,३१०), सातारा- २१ कोटी २१ लाख (१,९३,५६०), सोलापूर- ४६ कोटी ४१ लाख (२,५७,७९६), कोल्हापूर- ३१ कोटी ७० लाख (२,५९,१८६) आणि सांगली जिल्ह्यात २४ कोटी १० लाख रुपयांची (२,१६,०९६) थकबाकी आहे.

वीजपुरवठा खंडित ग्राहक

गेल्या ३५ दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ५० हजार १३६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला. यामध्ये पुणे जिल्हा- २८ हजार ५५८, सातारा- ५,३६५, सोलापूर- ५,५९८, कोल्हापूर- ४,७४१ आणि सांगली जिल्ह्यातील ५,८७४ थकबाकीदारांचा समावेश आहे.

ऑनलाइनद्वारे भरा वीजबिल

महावितरणकडून वीजग्राहकांना ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध करून दिली आहे. ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com