Pothole
PotholeTendernama

Pune: पालिकेचा उफराटा कारभार; 'या' भागातील नागरिक का आहेत नाराज?

Published on

पुणे (Pune) : पुणे शहरातील अन्य रस्त्यांप्रमाणेच सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यात खोदून ठेवले आहेत. त्याचा राडारोडा, माती रस्त्यावरच पडून असल्याने अपघाताची शक्‍यता आहे. त्याचबरोबर नागरिक, व्यावसायिकांनाही या खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.

Pothole
ठाणे क्लस्टर 10 तुकड्यात प्रत्येकी 17 एकरात राबवा: जितेंद्र आव्हाड

रविवार पेठ, कसबा पेठ परिसरातील नागरिकांना खराब पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. या पार्श्‍वभूमीवर खराब पाणी पुरवठा होत असलेल्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक या दरम्यान १७ मे रोजी दिवस रात्र ठिकठिकाणी खड्डे घेण्यात आले. जलवाहिनीचे काम झाल्यानंतर खड्ड्यांवर काही प्रमाणात माती, राडारोडा टाकून खड्डे बुझविल्याचा देखावा करण्यात आला. प्रत्यक्षात खड्डे पूर्णपणे बुजवून रस्ता पूर्ववत करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून झाला नाही.

Pothole
Pune शहरातील 'हे' लोन जिल्ह्यातही पसरतेय; सुरक्षेचे काय?

सोन्या मारुती चौक, पुढे रविवार पेठेतील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रासमोर, दिनेश ट्रेडिंग कंपनी, सक्‍सेस एंटरप्रायझेस दुकान आणि हरिदास माधवदास सुगंधी दुकानासमोरच रस्त्यांवर ५ ते १० फूट खोल खोदाई करण्यात आली आहे. तेथे राडारोडा, दगड, मातीचे ढीग त्या संबंधित रस्त्यावर तीन ते चार ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे.

खोदाईचे काम पूर्ण होऊन पाच दिवस झाले. परंतु अद्यापही खड्डे पूर्णपणे बुजविलेले नाहीत. रस्त्यांवर खड्डे असल्याने वाहने पार्किंग करण्यास, नागरिकांना ये-जा करण्यास अडचण होते. माती व राडारोड्यामध्ये दुचाकी अडकून अपघाताच्या घटनाही घडू शकतात.

Pothole
Nashik : 325 कोटींचे पानंद रस्ते रखडले; रोजगार हमीच्या अटी...

पाणी खराब येते म्हणून खोदाई केली, पाच दिवस उलटले तरी खड्डे बुजविले नाहीत. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी खड्डा लक्षात न आल्यामुळे एक दुचाकीस्वार खड्ड्यामध्ये पडला, असे अपघात वारंवार होऊ शकतात. धुळ मोठ्या प्रमाणात उडते, पार्किंगची अडचण झाली आहे. त्यामुळे त्याचा व्यवसायवरही परिणाम होत आहे.
- एक व्यावसायिक

Tendernama
www.tendernama.com