PMC
PMCTendernama

Pune : पुणे महापालिकेने काय दिली गुड न्यूज?

Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिकेतील (PMC) सुमारे १८ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्यांना दिवाळीपूर्वी ८.३३ टक्के बोनस त्याचप्रमाणे २३ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबत वित्त व लेखा विभागाने परिपत्रक काढले आहे.

PMC
Pune : ऊर्जा विभागाने शासकीय कोशागार कार्यालयच केले बायपास! काय आहे प्रकरण?

पुणे महापालिकेकडून दरवर्षी महापालिका अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बोनस देण्याचा निर्णय घेतला जातो. यासाठी अर्थसंकल्पात सुमारे १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेत नगरसेवक असताना स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर केला जात असे.

तसेच हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्यानंतर श्रेयासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चढाओढ सुरू होत असे. पण आता महापालिकेवर प्रशासक असल्याने ही प्रक्रिया सहज पूर्ण होत आहे.

PMC
Pune : सरकारच्या निकषांनुसार पुणे, पिंपरीत हवी आणखी 27 दुय्यम निबंधक कार्यालये

लेखा व वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकात १८ ऑक्टोबरपर्यंत सर्व बिले तपासून घेण्याचा आदेश विभाग प्रमुखांना दिला असून, दिवाळीपूर्वी ही रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

२०२३-२४ चे मूळ वेतन, महागाई भत्ता यावर ८.३३ टक्के आणि २३ हजार रुपये सानुग्रह अनुदान उपस्थितीच्या प्रमाणात दिले जाणार आहे. गेल्या वर्षभरात संबंधित सेवकांची प्रत्यक्ष हजेरी किमान १८० दिवस असणे आवश्‍यक आहे, त्यांनाच ही रक्कम दिली जाणार आहे.

Tendernama
www.tendernama.com