Pune: 4 वर्षे वाट पाहिली पण पालिका आमच्यापर्यंत पोहचलीच नाही!

Pune City
Pune CityTendernama

पुणे (Pune) : आधी महापालिकेत (PMC) समावेश, त्यानंतर नगरपालिकेच्या दिशेने वाटचाल असा प्रवास करणाऱ्या उरुळी देवाची (Uruli Devachi) गावातील पिंजनवस्ती येथे चार वर्षांत पालिकेचे पाणीच पोचलेच नाही. येथील रहिवाशांना अजूनही पाणी विकतच घ्यावे लागत आहे. त्याचा लाखो रुपयांचा खर्चही सहन करावा लागतो आहे.

Pune City
मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरचा अंतिम आराखडा सादर

डोंगराच्या आणि बंधाऱ्याच्या कडेला असलेल्या पिंजनवस्तीमध्ये महापालिकेचा पाण्याचा एकही टँकर पोचलेला नाही. त्यामुळे रहिवाशांना आजही पाणी विकतच घ्यावे लागत आहे. बंधाऱ्याच्या कडेला असल्याने येथील विहिरींना पाझरामुळे पाणी येते. त्यामुळे इतकी वर्षे पाण्याची कमतरता जाणवत नव्हती. मात्र पालिकेतील समावेशानंतर गावाच्या शहरीकरणाबरोबर या भागात रहिवाशांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे.

निसर्गरम्य वातावरण असल्याने नव्याने येणाऱ्या नागरिकांनी या भागाला पसंती दिली. त्यामुळे येथे पूर्वी असणाऱ्या विहिरींचे पाणी सध्या कमी पडू लागल्याने टंचाई जाणवत आहे. पालिकेत समावेश झाल्यानंतर पालिकेकडून पाणी मिळेल, अशी आशा होती; मात्र पालिकेचे कर्मचारी सर्व्हे करताना या भागात पोचलेच नाहीत, अशी खंत येथील रहिवासी अतुल पिंजण, सूरज पिंजण, मारुती भाडळे, दत्तात्रेय काळे यांनी व्यक्त केली.

Pune City
CM Shinde: धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अन् नालेसफाईवर..

पालिका आली; स्वप्नं दाखवली आणि स्वप्नं सत्यात न उतरवताच गेली. मिळकतकराची बिले देताना महापालिकेला घरे बरोबर सापडली; मात्र पाणी देताना त्यांना पिंजनवस्ती दिसलीच नाही. आमच्याप्रमाणे पालिका ही मुख्यमंत्री पेयजल योजनेची वाट पाहत राहिली.
- चैतन्य पिंजण, रहिवासी, पिंजनवस्ती

या भागात नव्याने नियुक्ती झाली आहे. येथील भागाची पाहणी करून त्वरित नागरिकांना टँकर उपलब्ध करून दिला जाईल.
- निखिल घरत, कनिष्ठ अभियंता, हडपसर क्षेत्रीय कार्यालय

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com