Pune : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरील प्रवास होणार आणखी वेगवान; दादा भुसेंची मोठी घोषणा

Expressway
ExpresswayTendernama

पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील (Mumbai - Pune Expressway) १३.३ किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम सप्टेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिल्या.

Expressway
Nashik : महापालिकेचा सिंहस्थ आराखडा सादर होणार; 'या' कामांचा समावेश

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या ‘मीसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची सार्वजनिक बांधकाममंत्री भुसे यांनी पाहणी केली. या वेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता राजेश पाटील, अधीक्षक अभियंता सतीश श्रावगी, कार्यकारी अभियंता अजित पाटील, उपअभियंता विशाल भोईटे आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, ‘‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ही कामे करीत असताना या विषयातील तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात येत आहे. येथे १८० मीटर उंचीचा सर्वांत उंच पूल आणि सर्वांत जास्त रुंदीचा बोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून, प्रवाशांच्या वेळेत व इंधनात बचत होणार आहे.’

Expressway
Nashik : सुमार दर्जाच्या कामांविरोधात ZP सीईओ आक्रमक; कार्यकारी अभियंत्यांना नोटीसा

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्प, नियोजित नागपूर-गोवा महामार्ग असे विविध महामार्ग पूर्ण करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाला जोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. असे अनेक प्रकल्प प्राधान्यक्रमाने कार्यान्वित होत असल्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळते आहे, असेही भुसे म्हणाले.

या पाहणीपूर्वी कुसगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाटील यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. प्रकल्पाची लांबी, रुंदी, उंची, किंमत तसेच मार्गिका, वाहनाची वेगमर्यादा, वाहतूक कोंडी, सुरक्षितता, पाण्याचा निचरा, कामाचा दर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आदींबाबत त्यांनी माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com