Pune Traffic News : पुणे अन् पुण्याचे ट्राफिक..! काय म्हणाले अजितदादा?

Pune
PuneTendernama

Pune News पुणे : पुणे शहरातील वाहतूक समस्येवर (Pune City Traffic) तोडगा काढण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

Pune
Pune News : पुणेकरांनो सावधान; महापालिका तुमचे कंबरडे मोडणार आहे!

पवार यांनी मंगळवारी (ता. २८) दृकश्राव्य माध्यमातून संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, ‘पीएमआरडीए’ आयुक्त राहुल महिवाल यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मेट्रोचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. वाहतूक पोलिसांनी शहरातील दहा प्रमुख रस्त्यांवरील उपाययोजनांचे यावेळी सादरीकरण केले.

Pune
Ambulance Tender Scam : आरोग्य खात्याचा पाय आणखी खोलात! ॲम्ब्युलन्स टेंडर घोटाळ्यातील धक्कादायक माहिती उजेडात

वाघोली येथील नादुरुस्त रस्ता, थेऊर फाटा ते लोणीकंद या रस्त्यावरील प्रलंबित कामे, पुणे - सोलापूर रस्त्यावरील ‘बीआरटी’मधील बस थांबे काढणे, कात्रज - मंतरवाडी रस्त्यावरील उंड्री - पिसोळी दरम्यान महावितरणचे विद्युत खांब आणि ट्रान्सफॉर्मर हटविणे, नवले पुलाजवळील रुंदीकरण अशा उपाययोजना पोलिसांनी बैठकीत सुचविल्या. वाहनचालकांच्या सोयीयाठी साधू वासवानी उड्डाणपूल पाडून नव्या पुलाची निर्मिती केली जाणार आहे.

Pune
Nashik : त्र्यंबकेश्वर सिंहस्थ आराखड्यात 2300 कोटींचे रस्ते; 63 कोटींचे विश्रामगृह

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू असून, सिमला ऑफिस चौक आणि संचेती चौकात गर्डर उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक वळविण्यात येणार आहे. यासंदर्भात पवार यांनी महापालिका आणि राज्य रस्ते विकास महामंडळाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com