Pune: चला चला G-20ची बैठक संपली; रस्ते खोदाईची वेळ झाली!

G-20 Pune
G-20 PuneTendernama

पुणे (Pune) : G-20 परिषदेच्या बैठकीनिमित्त काही रस्त्यांचे महापालिकेने (PMC) तत्काळ डांबरीकरण करून रस्ते चकाचक केले. मात्र डांबरीकरण करताना रस्त्यांवरील चेंबर खाली गेल्याने आता ठिकठिकाणी अपघात घडत असून, त्याचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. त्यातच महापालिकेकडून चेंबरची झाकणे वर घेण्यासाठी पुन्हा रस्ते खोदाई करण्यात येत असून, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ लागला आहे.

G-20 Pune
Aurangabad : सातारा-देवळाईकरांची मागणी योग्यच; पुलाखाली खोदकाम का?

महापालिका प्रशासनाकडून जी २० परिषदेच्या बैठकीनिमित्त शहरात येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, औंध, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, विमानतळ परिसरातील रस्त्यांसह काही रस्त्यांवर घाईगडबडीत डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे रस्ते चकाचक दिसू लागले. परंतु, डांबरीकरण करताना रस्त्यांवर असणाऱ्या चेंबरवरतीही डांबर टाकण्यात आले.

G-20 Pune
Riverfront : पाहायला अहमदाबादला जायची गरज नाही, आपल्या पुण्यातच..!

त्यामुळे डांबरीकरण झालेल्या बहुतांश रस्त्यांवरील चेंबर डांबरीकरणाखाली गेले. तसेच बाजीराव रस्त्यावर चेंबरच्या झाकणांभोवती खड्डा निर्माण होऊन दुचाकी वाहने त्यामध्ये अडकून अपघात घडू लागले आहेत. त्यामध्ये काही नागरिक जखमी झाल्याच्याही घटना घडू लागल्या आहेत. कारसह मोठ्या वाहनांचीही चाके अशा खड्ड्यांमध्ये जाऊन अपघाताची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या पथ विभागाकडून बाजीराव रस्त्यावरील चेंबरची झाकणे उघडण्यासाठी डांबरीकरण केलेला रस्त्यांवर पुन्हा एकदा खोदाई केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे.

G-20 Pune
Aurangabad: शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामातील अडथळा दूर

डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर लगेचच खोदाई करून दुरुस्ती करता येत नाही. त्यासाठी दोन ते तीन दिवस थांबावे लागते. त्यानुसार मंगळवारी रात्रीपर्यंत डांबरीकरणाखाली गेलेले चेंबर खाली खुले करण्यात येतील. त्यानंतर ते तत्काळ रस्त्याला समतल करण्यात येतील.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com