Pune : पुण्यातील 'या' वर्दळीच्या चौकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका? कारण...

Pune
PuneTendernama

पुणे (Pune) : सिंहगड (Sinhgad Road) व नगर रस्ता (Nagar Road) परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी (Traffic) होत असल्याने पुणे महापालिकेतर्फे (PMC) दांडेकर पूल चौक, येरवड्यातील बिंदू माधव ठाकरे चौक आणि शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल किंवा समतल विगलक (ग्रेड सेपरेटर) बांधणार आहेत. त्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी वर्षात ही कामे सुरु होण्याची शक्यता आहे.

Pune
Nagpur : नागपूर शहरापासून 80 किमीवर उभे राहतेय एक नवे आश्चर्य! लवकरच उद्घाटन

वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रस्ते अपुरे पडत आहेत. सध्या १० किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी किमान अर्धा तास लागतो. त्यामुळे कोंडीतून सुटका करण्यासाठी महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर उड्डाणपूल, समतल विगलक बांधून पर्यायी मार्ग केले जात आहेत. सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम थिएटर, गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठ चौकात उड्डाणपूल, कात्रज-कोंढवा रस्त्यावर समतल विगलक व रस्ता रुंदीकरण अशी कामे सुरू आहेत.

मेट्रोचा विचार करावा लागणार

सिंहगड रस्त्यावरील सव्वादोन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. डेक्कन, स्वारगेट, कात्रज आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतूक दांडेकर पूल चौकामध्ये एकत्र येते. त्यामुळे हा चौक महत्त्वाचा आहे. खडकवासला ते हडपसर-खराडी हा मेट्रोमार्ग प्रस्तावित आहे. या चौकात मेट्रोच्या पिलरच्या अलाइनमेंटचा विचार करून उड्डाणपूल किंवा समतल विगलकाचा आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी महापालिकेने महामेट्रोशी पत्रव्यवहार केला आहे.

Pune
Nashik : रस्ते झाडण्यासाठी 21 काटींचे चार यांत्रिकी झाडू महिनाखेरीस येणार

गोंधळ उडवणारा चौक

नगर रस्त्यावरून गोल्फ क्लब चौकाकडे उजव्या बाजूला वळताना वाहनचालकांचा गोंधळ उडतो, तसेच या भागात अवजड वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे वाहतूक मंदावलेली असते. या चौकाचा अभ्यास करून उड्डाणपूल बांधायचा की समतल विगलक किंवा दोन्ही पर्याय सुचविले जाऊ शकतात.

वाहनचालकांच्या सोयीसाठी नियोजन

शिवाजीनगरहून नगर रस्ता, विमानतळ, विश्रांतवाडीकडे जाण्यासाठी पाटील इस्टेट येथून सुरू होणारा संगमवाडी रस्ता महत्त्वाचा आहे. बिंदू माधव चौकात हा रस्ता संपतो. वाहनचालकांसाठी हा रस्ता सोयीचा असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

गर्दीच्या वेळी या चौकातून पुढे जाण्यासाठी वाहनचालक सिग्नलवर अडकून पडतात. त्यामुळे भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने येथे पर्यायी रस्ता करण्यासाठी उड्डाणपूल, समतल विगलक उभारणीचे नियोजन सुरू केले आहे.

Pune
Ajit Pawar : नाशिक जिल्ह्यातील तहानलेल्या 'या' 2 तालुक्यांचे प्रश्न मार्गी लागणार का?

अर्थसंकल्पात ४० कोटींची तरतूद

या तिन्ही चौकातील कामांच्या सल्लागार नियुक्तीसाठी महापालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत दोन महिन्यांत निर्णय होईल. या कामासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद आहे.

सल्लागारामार्फत तिन्ही चौकातील वाहतूक सर्वेक्षण, उपलब्ध जागेचा विचार करून उड्डाणपूल, समतल विगलक यापैकी काय बांधावे, याचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) सादर केला जाईल. यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता आगामी वर्षात कामाला सुरवात होऊ शकते, असे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अजय वायसे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com