Pune: एक धरण भरेल एवढे पाणी वाचणार! काय आहे मेगा प्लॅन?

Khadakwasla Dam Pune
Khadakwasla Dam PuneTendernama

पुणे (Pune) : खडकवासला ते लोणी काळभोरपर्यंतचा (Khadakwasla To Loni Kalbhor) कालवा बोगद्यातून (Tunnel) करण्यात येणार असून, त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बोगद्यामुळे तीन टीएमसी (TMC) पाणी वाचणार आहे. पुढील तीन महिन्यांत या कामाचे टेंडर (Tender) निघणार आहे.

Khadakwasla Dam Pune
Nashik : दोन योजनांसाठी 530 कोटी मंजूर; नाशिकसह मराठवाड्याला लाभ

यवत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार राहुल कुल यांनी ही माहिती दिली. यावेळी भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात उपस्थित होते.

कुल म्हणाले, बोगद्याला दोन हजार कोटी रुपये खर्च येणार असला, तरी तीन टीएमसी पाण्याची उपलब्धता ही फार मोठी बाब आहे. एका धरणाइतके हे पाणी आहे. या कालव्याची रुंदी काही ठिकाणी १०० मीटर; तर काही ठिकाणी २०० मीटरपर्यंत आहे. खडकवासला ते लोणी काळभोरपर्यंत कालव्यावरून रस्ता करू शकतो. कालव्यावरून होणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनाची किंमत काढली ती १२ ते १४ हजार कोटी रुपयांपर्यंत गेली असती. त्यामुळे हा प्रकल्प फायद्यातील आहे. पैशांपेक्षा पाणी महत्त्वाचे आहे. प्रस्तावित जागेत जमिनीत काळा पाषाण दगड असल्याने हे शक्य होत आहे.

Khadakwasla Dam Pune
राज्यातील आदिवासी ग्रामपंचायतींसाठी केंद्र सरकारचे 324 कोटी रुपये

दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या बेबी कालव्याचे मुंढवा ते लोणीकाळभोर दरम्यानचे अस्तरीकरण झाले आहे. मात्र, लोणी ते पाटसपर्यंतच्या अस्तरीकरणात दिरंगाई होत असल्याने मी हक्कभंगाची नोटीस दिल्यावर पाटबंधारे विभागाने आता हे काम करण्याचे मान्य केले आहे. या उर्वरित कामासाठी २५० कोटी रुपयांचा खर्च निधी उपलब्ध होणार आहे.

जानाई योजनेसाठी २०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. शिरसाई योजना बंद नळीतून करण्याचा प्रस्ताव तयार करतोय. खुपटेवाडी फाटा, विजयवाडी तलाव, लाळगेवाडी, जिरेगाव, गायकवाड मळा येथील पाणी समस्यांवर मार्ग काढण्याचे काम चालू आहे. मुळशी धरणाचे पाणी वळविण्याबाबतचा अहवाल तयार करण्याचे काम चालू आहे. येत्या ३-४ महिन्यात सरकारला त्यावर निर्णय घ्यावा लागेल, असे कुल यांनी सांगितले.

Khadakwasla Dam Pune
Good News: अखेर असा सुटला शिवाजीनगर रेल्वे भुयारीमार्गाचा तिढा?

खडकवासला धरण ते लोणीकाळभोर दरम्यानच्या बोगदा (दोन हजार कोटी), जानाई योजना (२०० कोटी), बेबी कालवा (२५० कोटी) या तीन प्रकल्पांना एशियन बँक अर्थसाहाय्य करण्यास तयार आहे. बँकेने प्राथमिक मान्यता दिली आहे.

- राहुल कुल, आमदार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com