SPPU Chowk
SPPU ChowkTendernama

Pune : विद्यापीठ चौकातून बाणेरला जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा! वाहतुकीत आजपासून...

Published on

पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (SPPU Chowk) वाहतूक कोंडी (Traffic) सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. विद्यापीठ चौकातून बाणेरला जाणारा रस्ता सोमवारपासून (ता. १५) खुला होणार आहे. त्यामुळे या चौकात होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होणार आहे.

SPPU Chowk
Nashik : MIDC आहे की रियलइस्टेट कंपनी? सिन्नर-माळेगावच्या भूखंड दरावरून...

पुणे विद्यापीठ चौक परिसरात मेट्रो आणि रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापासून बाणेर रस्त्याने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. या रस्त्यावरील काही कामे पूर्ण झाल्याने बाणेरकडे जाणारा रस्ता खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे बाणेरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

SPPU Chowk
Pune : मोठी बातमी! 'या' निबंधक कार्यालयातील नवीन दस्तनोंदणी राहणार बंद; कारण...

तसेच, शिवाजीनगर येथून विद्यापीठाच्या पुढे पाषाणकडे जाण्यासाठी आनंद ऋषिजी महाराज चौकातील पिलरच्या अगोदर डाव्या बाजूच्या स्वतंत्र मार्गिकेचा (लेन) वापर करावा. बाणेरला जाण्यासाठी बाणेर रस्त्याच्या डाव्या मार्गिकेमधून जावे.

तसेच, पाषाण येथून विद्यापीठासमोरील आनंद ऋषिजी महाराज चौकाकडे येण्यासाठी पूर्वीप्रमाणेच अभिमानश्री सोसायटी जंक्शन पाषाण रस्ता येथून डावीकडे वळून बाणेर रस्त्याने सकाळनगरमार्गे येता येईल, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.

Tendernama
www.tendernama.com