Pune : पुणेकरांना दिलासा; कर वाढ नाही, अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यावर भर

PMC Pune
PMC PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिकेचे (PMC) आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आगामी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा १२ हजार ६१८.०९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. यामध्ये कोणीतीही करवाढ केली नाही. शहरात मोठ्या प्रकल्पांची घोषणा न करता रस्त्यांच्या कामांसाठी भूसंपादन करणे, गेल्या दोन-तीन वर्षांतील अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

PMC Pune
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन ‘बेकायदेशीर’; 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार भरपाई

पुणे महापालिकेच्या खर्चामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. मात्र मिळकतकर, बांधकाम विकास शुल्क, पाणीपट्टी वसुली यांसह अन्य मार्गांनी उत्पन्न वाढीवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोणत्याही नव्या प्रकल्पांची घोषणा न करता दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेली कामे पुढील वर्षभरात पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

याबाबत आयुक्त भोसले म्हणाले, या अर्थसंकल्पात स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी परिमंडळ उपायुक्त स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन केली जाईल. महापालिकेच्या मालकीच्या जागांचा किफायतशीर वापर करून उत्पन्न वाढवले जाईल.

PMC Pune
Devendra Fadnavis : ‘त्या’ 25 हजार कोटींच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करा

अशी आहेत वैशिष्ट्य...
१) शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मिसिंग लिंकच्या रस्त्यांना प्राधान्य
२) भूसंपादन करताना जागा मालक टीडीआर घेत नसल्याने त्यांना रोख मोबदला देण्यासाठी २०० कोटींपेक्षा जास्त निधी
३) कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी ७५ कोटी, इतर कामांसाठी ५० कोटींची तरतूद
४) भूसंपादनामध्ये शहरातील इतर महत्त्वाच्या रस्त्यांचाही समावेश
५) अमृत महोत्सवी आरोग्य योजनेत झोपडपट्टीतील नागरिकांची आरोग्य तपासणी, महापालिकेच्या रुग्णालयांचे आधुनिकीकरण, कर्करोग तपासणीसाठी पेट स्कॅन प्रकल्पांचा समावेश
६) समाविष्ट गावांसाठी ६२३ कोटींची तरतूद. यातून रस्ते, पथदिवे, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा आदी कामे करणार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com