Pune: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला वेग येणार, कारण...

सहा हजार कोटींचे कर्ज देण्यास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील
Purandar Airport
Purandar AirportTendernama
Published on

मुंबई (Mumbai): पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळाच्या विकासाला चालना मिळावी याकरिता आवश्यक भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Purandar Airport
Mumbai Vadodara Highway: लोकार्पणापूर्वीच फूट ओव्हर ब्रिज कोसळला; कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह

पुरंदर विमानतळाच्या विकासासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची (स्पेशल पर्पज व्हेईकल – एसपीव्ही) स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ- एमआयडीसी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी एमएडीसी, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) व अन्य संस्थांची एसपीव्ही स्थापन करण्यात आली आहे.

Purandar Airport
Pune: पुणेकरांसाठी सरकारने काय दिली गुड न्यूज?

परिसरातील सुमारे ९६ टक्के शेतकऱ्यांची विमानतळासाठी समंतीपत्र मिळाली आहेत. त्यानुसार आता मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी उभा करण्यासाठी विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. असे कर्ज उपलब्ध करून घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच या कर्जास शासन हमी देण्यास ही मंजुरी देण्यात आली.

Purandar Airport
Nashik ZP: जलयुक्तच्या टेंडरमधील अतिशर्तीचा डाव उधळला

यामुळे पुरंदर विमानतळासाठी आवश्यक भूसंपादनास गती मिळणार आहे. या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी एसपीव्हीमधील सहभागीदारी, त्यांच्याकडील भागीदारीनुसार राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com