Pune : शिवाजीनगर ते लोणी काळभोर मेट्रो प्रकल्पाबाबत PMRDAचा मोठा निर्णय

MMRDA
MMRDATendernama

पुणे (Pune) : शिवाजीनगर ते लोणी काळभोर (Shivajinagar To Loni Kalbhor Metro Line) या दरम्यानचा मेट्रो प्रकल्प खासगी भागीदारी तत्त्वावर (PPP) राबविणे शक्य आहे का, याबाबतचा ‘व्यवहार्यता तपासणी अहवाल’ (प्री-जिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) घेतला आहे.

MMRDA
Nashik-Pune मार्गावर शिवशाही बंद झाल्याने आता 'हा' आहे नवा पर्याय

नुकतीच ‘पुमटा’ची बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवाजीनगर ते लोणी काळभोर या दरम्यान मेट्रो प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविणे शक्य आहे का, यासाठी ‘प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट’ तयार करण्याच्या सूचना ‘पीएमआरडीए’ला दिल्या. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया ‘पीएमआरडीए’ने सुरू केली आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मध्यंतरी ‘पुमटा’ची बैठक झाली होती. या बैठकीला पुलगेट ते हडपसर दरम्यान आठ किलोमीटर मार्गाचा तांत्रिक व आर्थिक अहवाल ‘पीएमआरडीए’ आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे तयार करावा. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कोणाचा प्रकल्प व्यवहार्य आहे. त्यावर कोणी त्या मार्गाचे काम करावे, यावर निर्णय घेण्यात यावा असे ठरले होते.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील याबाबतच्या सूचना ‘पीएमआरडीए’ आणि महामेट्रोला दिल्या होत्या. त्यानुसार ‘पीएमआरडीए’ आणि महामेट्रो यांच्या एकत्रित बैठका झाल्या. या बैठकीमध्ये तांत्रिक मुद्द्यावर चर्चा झाली. हे तिन्ही मार्ग करण्याची तयारी दोन्ही संस्थांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय ‘पुमटा’कडे (पुणे युनिफाईड अर्बन ट्रान्स्पोर्ट ॲथॉरिटी) सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

MMRDA
Nashik : 'या' धरणातून होणार राज्यातील पहिला बंदिस्त कालवा

आत्तापर्यंत...

- पुणे शहरात हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे.

- पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने घेतले आहे.

- ‘पीएमआरडीए’ आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

- त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणी काळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय ‘पीएमआरडीए’ने घेतला आहे.

- खडकवासला ते खराडी २८ किलोमीटर मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे.

- ‘पीएमआरडीए’चा विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर पुलगेट, हडपसर आणि लोणी काळभोर, तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे.

- महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे.

- या दोन्ही मार्गांवर पुलगेट ते हडसपर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग कॉमन (एकत्रित) असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

MMRDA
वैभववाडी-कोल्हापूर 3400 कोटींच्या रेल्वे मार्गास PM गतीशक्तीची शिफारस

‘महामेट्रो’चे म्हणणे...

माण या ठिकाणी मेट्रोसाठी कारडेपो आहे, तसेच लोणी काळभोर या ठिकाणीदेखील मेट्रोच्या कार डेपोसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुलगेट ते हडपसर हा या मेट्रो मार्गाचे काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ‘पीएमआरडीए’ची आहे, तर खडकवासला येथे मेट्रोसाठी कारडेपो करण्यात येणार आहे, त्यामुळे पुलगेट ते हडपसर या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम आम्ही करतो, असे ‘महामेट्रो’चे म्हणणे आहे.

अशी आहे स्थिती

- खडकवासला-स्वारगेट-पुलगेट-हडपसर फाटा (मगरपट्टा सिटी) ते खराडी हा सुमारे २८ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग महामेट्रेाने प्रस्तावित केला आहे.

- शिवाजीनगर-पुलगेट-हडपसर ते लोणी काळभोर हा १९ किलोमीटर मेट्रो मार्ग ‘पीएमआरडीए’ने प्रस्तावित केला आहे.

- त्यापैकी पुलगेट ते हडपसर हा आठ किलोमीटरचा मार्ग कॉमन असल्याने तो कोणी विकसित करावा, यावर निर्णय घेण्यासाठी बैठक.

MMRDA
Pune-Nashik Railway : चौथ्यांदा मार्ग बदलणार?; काय आहे कारण...

शिवाजीनगर ते लोणी काळभोर हा मेट्रो मार्ग पीपीपी तत्त्वावर राबविणे शक्य आहे का, यांची तपासणी करण्यासाठी प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याच्या सूचना ‘पुमटा’च्या बैठकीत ‘पीएमआरडीए’ला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सल्लागार नेमण्याची प्रक्रिया ‘पीएमआरडीए’ने सुरू केली आहे.

- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, मेट्रो प्रकल्प पीएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com