
पुणे (Pune) : प्रवाशांच्या मागणीचा विचार करून पीएमपी (PMP) प्रशासनाने दोन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात लेकटाऊन सोसायटी ते शिवाजीनगर आणि कात्रज ते वाघोली असे दोन नवीन मार्ग एक एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून हे मार्ग सुरू करण्याची मागणी केली जात होती.
त्यानुसार हे मार्ग सुरू करण्यात आले आहे. लेकटाऊन ते शिवाजीनगर या मार्गावर साधारण एक तास ४५ मिनिटांनी बस असेल. ही बस अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, स्वारगेट, शनिपार या मार्गे धावेल.
तर, कात्रज ते वाघोली मार्गावरची स्वारगेट, पुणे स्टेशन, येरवडा, खराडी बायपास या मार्गे दर ५० मिनिटांनी बस धावणारआहे. या नव्या बस सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीच्यावतीने करण्यात आले.