Pune : पुणेकरांचा 'शिमगा'! PMPMLचे ठेकेदार का गेले संपावर?

PMP
PMPTendernama

पुणे (Pune) : पीएमपीएमएलच्या (PMPML) ठेकेदारांच्या (Contractors) संपाचा फटका सामान्य पुणेकरांना सहन करावा लागतो आहे. पीएमपीएमएल ठेकेदारांनी रविवारी दुपारी अचानक संप पुकारला. आज दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच होता. ओलेक्ट्रा, हंसा, अँथोनी, ट्रॅव्हल टाईम या चार ठेकेदारांनी संप पुकारला आहे. ३ महिन्यांची बिले थकल्यामुळे या ठेकेदारांनी संप पुकारला आहे.

PMP
Nashik ZP : 'जलजीवन'च्या 185 योजनांचे घोंगडे अडकले कुठे?

ठेकेदारांच्या संपामुळे फटका पुणेकरांना बसणार आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक यामुळे कोलमडण्याची शक्यता आहे. जवळपास 1100 बसेस यामुळे धावणार नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी ठेकेदारांना हा संप मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र ठेकेदार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ठेकेदारांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे.

PMP
Good News : जुनी पेंशन लागू करण्याबाबत केंद्राची मोठी घोषणा

रविवारी ठेकेदारांनी अचानक संपाचा निर्णय घेतल्यानंतर रस्त्यावर पीएमपीएमएल बस संख्या अचानक कमी झाली. पीएमपीएमएलकडे सध्या 2142 बसेस आहेत. यापैकी 1100 बसेस या ठेकेदारांच्या असून इतर 900 बसेस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com