Pune : 'स्मार्ट' पुणेकरांसाठी 'स्मार्ट सेवा'; पालिकेने सुरू केली 'ही' हायटेक सुविधा

PMC Pune
PMC PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : नव्या स्वरुपातील ‘पीएमसी केअर’ ॲप व पोर्टलमुळे (PMC Care App & Portal) महापालिका (PMC) प्रशासनाला आपली बाजू नागरिकांपर्यंत व्यवस्थित पोचविता येईल. त्याचबरोबर सर्व सुविधा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होतील. त्यामुळे ‘पीएमसी केअर’ हे नागरिकांना महापालिकेशी जोडण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरेल, असे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

PMC Pune
Nashik : 56 कोटींच्या रेल्वे चाक निर्मिती कारखान्याची यशस्वी चाचणी

पुणे महापालिकेच्या अद्ययावत ‘पीएमसी केअर’चे उद्‌घाटन बिनवडे व ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

PMC Pune
Nagpur : नागपूर शहरापासून 80 किमीवर उभे राहतेय एक नवे आश्चर्य! लवकरच उद्घाटन

बिनवडे म्हणाले, ‘‘‘पीएमसी केअर’ डिजिटल व्यासपीठामुळे महापालिकेशी संबंधित प्रत्येक घटनेची माहिती लोकांना मिळेल. महापालिकेशी संबंधित तक्रार नोंदविणे, मिळकतकर व पाणीपट्टी भरणा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, विविध प्रमाणपत्रे, टेंडर, परवानग्या अशा सर्व सुविधा नागरिकांना सहज उपलब्ध होतील. महापालिकेच्या उपक्रमांची माहिती मिळेल. नागरिकांना त्यावर ब्लॉग, लेख देखील लिहिता येतील. महापालिकेच्या सुविधांसाठी वेगवेगळे ॲप वापरण्यापेक्षा एकाच ॲपवर सर्व माहिती मिळू शकणार आहे.

PMC Pune
Mumbai : बेस्टकडून धक्कादायक निर्णय; पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली सेवा बंद

‘पीएमसी केअर’ हे डिजिटल व्यासपीठ लहान मुले, तरुण, गृहिणी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यावर शिक्षण, मनोरंजन, शहरातील घटनांची माहिती, आरोग्य, खाद्यपदार्थ यासंबंधीची सर्व माहिती मिळणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा आयओएस ॲप स्टोअर यावर उपलब्ध आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com