Pune City
Pune CityTendernama

Pune News : पुणेकरांचा प्रवास सुखाचा काधी होणार?

Published on

Pune News पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर उमेदवारांनी पुणेकरांवर आश्वासनांचा पाऊल पाडला आहे. मात्र, असे असले तरी पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर, वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाढत्या पुण्याचा भार पेलावू शकतील अशा पायाभूत सुविधांची निर्मिती या मुद्द्यांवर ठोस असा रोड मॅप देण्यात उमेदवार कमी पडत असल्याचे शहरातील जाणकारांचे मत आहे.

Pune City
Nashik : प्रस्तावित नाशिक-पुणे सेमीहायस्पीड रेल्वे मार्गाला आणखी किती फाटे फुटणार?

जलद, सुरक्षित आणि किफायतशीर पीएमपीच्या (PMPML) सेवेतून पुणेकरांचा प्रवास आनंददायी व्हावा, यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुण्यातील प्रचारफेरी दरम्यान मोहोळ यांनी ही माहिती दिली.

Pune City
Nagar : निळवंडे धरणावर पाणी वाटपाचे नवे मॉडेल राबवा; थोरातांचा फडवीसांना प्रस्ताव

मोहोळ म्हणाले, ‘‘सार्वजनिक वाहतुकीसाठी देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेस पीएमपीच्या ताफ्यात आहेत. गेल्या पाच वर्षांत पीएमपीला केंद्र सरकारच्या ‘फेम २’ योजनेंतर्गत १५० ई-बसेस मिळाल्या आहेत. अपेक्षित ६५० ई-बसेसपैकी ४७३ बसेसचा वापर सुरू झाला असून, उर्वरित बसेस लवकरच येतील.

Pune City
Nashik News : नाशिक शहरात CCTV बसवले; पण वीज जोडणीचे काय?

शहराच्या चारही दिशांना सहा ई-बस चार्जिंग डेपो कार्यान्वित केले आहेत. ५०० सीएनजी बसेसची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. इलेक्ट्रिक बसमुळे वहनखर्चात ७० टक्के तर कार्बन उत्सर्जनात ५० टक्के घट होते. मेट्रो नेटवर्कला फीडर सेवेवर भर देणार आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

Tendernama
www.tendernama.com