Pune News : पुणेकरांनो धोकादायक होर्डिंग दाखवा, आम्ही तातडीने...

hoarding
hoardingTendernama

Pune News पुणे : नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ४९१ होर्डिंगपैकी ११ धोकादायक होर्डिंग हटविण्यात आली आहेत. याप्रकरणी कारवाई अद्याप सुरू आहे, अशी माहिती परवाना निरीक्षक गणेश भारती यांनी दिली.

hoarding
मराठवाड्यातील 'त्या' द्रुतगती मार्गासाठी चार कंपन्या लोअर बिडर

महिनाभरात मुंबईसह पुण्यात सहा ठिकाणी होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत १६ जणांचा बळी गेला तर ५० पेक्षा अधिक जखमी झाले. पुण्यात सुदैवाने केवळ तिघे जखमी झाले असून जीवितहानी टळली. वाहनांचे मात्र नुकसान झाले. वाघोलीत होर्डिंग दुर्घटनेत दोन कार व दुचाकींचे नुकसान झाले.

वाघोली वगळता अन्य दुर्घटनेत होर्डिंग मालकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीतील होर्डिंग अधिकृत तसेच स्ट्रक्चरल ऑडीट केलेले होते. तरीही ते कोसळले मात्र केवळ नोटीस बजाविण्यात आली. गुन्हा दाखल झालेला नाही. या सर्व दुर्घटनांमुळे होर्डिंगचा विषय चांगलाच गाजला.

hoarding
Nagpur : स्मार्ट प्रीपेड मीटर्स; वादग्रस्त 'मॉन्टे कार्लो' कंपनीला टेंडर

राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेश दिले, तर पुणे महापालिका आयुक्तांनीही सात दिवसांत धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्वेक्षण करून धोकादायक होर्डिंग हटविण्याचे काम सुरू आहे.

लोहगावमधील पाच तर वाघोली व खराडीमधील सहा असे ११ होर्डिंग हटविण्यात आले. अद्याप कारवाई सुरू आहे. सर्व होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करावे अशी नागरीकांची मागणी आहे.

दरम्यान, जे होर्डिंग धोकादायक वाटतात, त्याबाबत नागरिकांनी संपर्क साधून माहिती द्यावी. त्याची पाहणी करून ते हटविण्यात येईल, असे आवाहन परवाना निरीक्षक गणेश भारती यांनी केले आहे.

hoarding
Amravati News : अमरावतीच्या तहसीलदारांचे लेआउट प्रकरणात निलंबन; मात्र अवघ्या 24 तासांत स्थगिती कशी काय?  

होर्डिंगचे सांगाडेच सांगाडे

सध्या वळवाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह कोसळत आहे. या वाऱ्यामुळे होर्डिंगवर लावलेला फ्लेक्स फाटून कुठेही उडून पडतो. बहुतांश ते विद्युत तारांवर पडतात. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे ते प्लेक्स कापड हटविण्याचा आदेश अधिकाऱ्यांनी दिल्याचे कळते. यामुळे सध्या सर्वत्र उभे असलेले होर्डींगचे सांगाडेच सांगाडे दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com