PMP Bus PuneTendernama
पुणे
Pune News : ठेकेदारांचे PMP बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष; प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
पुणे (Pune) : पुणे मनपा ते मुकाई नगर बसच्या स्टिअरिंगचा रॉड अचानक तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकली.
रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गणेशखिंड रस्त्यावर केंद्रीय विद्यालयाजवळ हा अपघात झाला. यात तीन ते चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वेगात असलेली बस काही कळण्याच्या आतच रस्त्याच्या शेजारी असलेल्या झाडाला जाऊन धडकली. त्यामुळे बसमधील प्रवासी जखमी झाले. बसचे देखील मोठे नुकसान झाले.
ही बस 'हंसा' या ठेकेदार कंपनीची आहे. या अपघातामुळे ठेकेदारांच्या बसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघातग्रस्त बस ही निगडी आगाराची आहे.