Pune: पालिकेने सोडविला 'हा' महत्त्वाचा प्रश्न; ऑगस्टमध्ये होणार...

garbage
garbageTendernama

पुणे (Pune) : पुणे महानगरपालिका (PMC) प्रशासनाकडून सॅनिटरी पॅड व डायपरवर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प खासगी कंपनीमार्फत उभारण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यापासून हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे सॅनिटरी पॅड, डायपरची विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

garbage
Exclusive: आस्तिककुमार पाण्डेय कुणाच्या दबावाला बळी पडले?

शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेल्या सॅनिटरी पॅड, डायपर या स्वरुपातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. सध्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या कचऱ्यावर सुक्‍या कचऱ्यासमवेत प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे हा कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हडपसरमध्ये प्रकल्प उभारणी

नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रश्‍नाची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ‘सॅनिटरी वेस्ट’वर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले, मात्र ते वेगवेगळ्या कारणांमुळे बंद पडले होते.

या पार्श्वभूमीवर ‘प्रॉक्‍टर ॲण्ड गँबल’ या सॅनिटरी पॅड आणि डायपर उत्पादक कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (CSR) माध्यमातून सॅनिटरी पॅड आणि डायपरवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याची तयारी अडीच वर्षांपूर्वी दाखविली होती. त्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती.

garbage
मोठी बातमी : नगर, पुणेप्रमाणे नाशिक ZPत कामाचे वाटप ऑनलाईनच होणार

हा प्रकल्प हडपसर येथील रोकेम कंपनीजवळील महापालिकेची जागेत उभारला आहे. त्यासाठी सर्व विभागांच्या परवानग्याही मिळाल्या असून प्रकल्पाचे कामही पूर्ण झाले आहे. एक ऑगस्टपासून संबंधित प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी दिली.

अशी होणार प्रक्रिया

- सॅनिटरी पॅड आणि डायपरवर रासायनिक प्रक्रिया करून त्यापासून सेल्युलोज, प्लास्टिक आणि फायबर निघणार आहे.

- या घटकांचा वापर अन्य उत्पादनांसाठी करण्यात येतो.

- साधारण एक टन पॅडस व डायपरमधून जवळपास ३०० किलो सेल्युलोज, प्लास्टिक आणि फायबर मिळते.

- रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर त्याचा वापर सपाटीकरण करण्यासाठी केला जातो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com