Pune Metro: स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सार्वजनिक कधी करणार?

Pune Metro
Pune MetroTendernama

पुणे (Pune) : स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (COEP) ‘महामेट्रो’कडे गुरुवारी सोपविला. वनाज-गरवारे महाविद्यालय मार्गावरील मेट्रो मार्ग आणि चारही स्थानके सुरक्षित आहेत, असे त्यात म्हटले असल्याचे ‘महामेट्रो’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी कळविले. (Pune Metro)

Pune Metro
ग्रामपंचायत ते झेडपी खरेदीतील गैरप्रकारांना आळा बसणार, कारण...

मेट्रो स्थानकांच्या त्रुटींबाबत काही अभियंत्यांनी मेट्रोला पत्राद्वारे कळविले होते. तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने निकाल देताना, मेट्रो मार्ग आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा आदेश ‘सीओईपी’ला दिला होता. त्यानुसार ‘सीओईपी’ने वनाज-गरवारे महाविद्यालय मार्ग आणि वनाज, आनंदनगर, नळस्टॉप, गरवारे महाविद्यालय या स्थानकांची पाहणी आणि अभ्यास करून अंतिम अहवाल महामेट्रोकडे गुरुवारी दिला.

या अहवालात ‘सीओईपी’ने म्हटले आहे की, ‘मेट्रोची स्थानके ही सुरक्षित आहेत. स्थानकांना भेट देऊन त्यांचे निरीक्षण करण्यात आले. तसेच मेट्रो स्थानकांच्या संरचनेचे विश्लेषण करून त्यांची भूकंप विरोधक क्षमताही पडताळण्यात आली. त्यामध्ये असे निदर्शनास आले आहे की, मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी उपाययोजना करण्यात आली असून मेट्रो स्थानके सुरक्षित आहेत.’

Pune Metro
सातारकरांना अशी खरेदी करता येणार ऑनलाइन वाळू; टेंडर निघाले...

स्ट्रक्चरल ऑडिटर नारायण कोचक आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट शिरीष खासबारदार यांनी या बाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तसेच मेट्रो प्रकल्प हा नागरिकांच्या पैशांतून होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा सार्वजनिक आहे. त्यामुळे महामेट्रो आणि ‘सीओईपी’ यांनी स्ट्रक्चरल ऑडिटमधील तपशील जाहीर करावेत, अशी मागणी केली होती. परंतु, दोन्ही संस्थांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही, असे कोचक यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com