Pune: 'या' विभागात 4,751 जागांची मोठी भरती; 25 मे पर्यंत करा...

Mantralaya
MantralayaTendernama

पुणे (Pune) : राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट ‘क’ संवर्गातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Mantralaya
Ratnagiri : 'जलजीवन मिशन'चे होणार थर्ड पार्टी ऑडिट

एकूण ४,७५१ पदांपैकी तब्बल चार हजार पदे परिचारिकांची असून त्यासाठी येत्या २५ मेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने स्पष्ट केले.

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत येणारी गट-क परिचऱ्या, तांत्रिक व अ-तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारित वेतनश्रेणी व नियमानुसार लागू असणारे भत्ते दिले जाणार आहेत. रिक्त पदे सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या नियमानुसार भरली जातील.

Mantralaya
Nashik ZP : प्लास्टिक विघटन यंत्र खरेदीचे वादग्रस्त टेंडर रद्द

अधिपरिचारिक पदांचे विवरण
अधिपरिचारिकांची ३,९७४ पदे भरली जाणार असून त्यातील १९५४ पदे खुल्या संवर्गासाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी ३२१ आणि अनुसूचित जातीसाठी ३३८ पदे तर उर्वरित पदे इतर संवर्गासाठी आहेत.

Mantralaya
Devendra Fadnavis साहेब, पुणेकरांना आनंदाची बातमी कधी देणार?

इतर पदे
प्रयोगशाळा सहाय्यक १७०, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ११२, ग्रंथपाल १२, स्वच्छता निरीक्षक ९, ईसीजी तंत्रज्ञ ३६ ,आहार तज्ज्ञ १८, औषधनिर्माता १६९, कॅटलॉग/ ग्रंथसूचीकार १९, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) ८६, ग्रंथालय सहाय्यक १६, व्यवसायोपचार तज्ज्ञ/ ॲक्युपेशन थेरपीस्ट ७, दूरध्वनी चालक १७, महिला अधीक्षिका किंवा वॉर्डन वसतिगृह प्रमुख ०५, अंधारखोली सहाय्यक १०, किरण सहाय्यक २३, सांख्यिकी सहाय्यक ३, शिंपी १५, वाहन चालक ३४, गृहपाल १६ अशा विविध पदांची जाहिरात संचालनालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com