Pune : गणेशखिंड रोडवरील कोंडीबाबत पोलिसांनी घेतला मोठा निर्णय...

SPPU Ganeshkhind Road
SPPU Ganeshkhind RoadTendernama

पुणे (Pune) : आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक परिसर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक SPPU Chowk), गणेशखिंड व बाणेर रस्त्यावर मेट्रोचे (Metro) काम सुरू आहे. त्यामुळे यापूर्वी गणेशखिंड (Ganeshkhind) रस्त्यावर जड वाहनांना (Heavy Vehicals) बंदी होती. मात्र, मेट्रोच्या पुढील टप्प्याचे काम सुरू झाल्याने रस्त्यावर ११ मीटरपर्यंत बॅरिकेडींग केली असून, वाहतुकीसाठी केवळ दोन लेन उपलब्ध होत आहेत. त्यातच रात्री या भागात जड व माल वाहतूक करणारी वाहने आल्याने प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे ही कोंडी सोडविण्यासाठी जड वाहनांना रविवारी रात्रीपासून बंदी घातली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

SPPU Ganeshkhind Road
Aurangabad: 40 वर्षापासून रखडलेली हर्सूलची कोंडी फुटली; पुढचे काय?

अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, पोलिस, मनपाकडील वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, मेट्रोच्या कामाकरिता असलेली वाहने वगळून मालवाहतूक, जड वाहतूककरिता २४ तास बंदी घातलेले रस्ते...

गणेशखिंड रस्ता : संचेती चौक ते राजीव गांधी पूल (दोन्ही बाजूने)

बाणेर रस्ता : राधा चौक ते शिवाजीनगरकडे येण्यासाठी

पाषाण रस्ता : सूस ते शिवाजीनगरकडे येण्यासाठी

सेनापती बापट रस्ता : विधी महाविद्यालय रस्त्याकडून सेनापती बापट रस्ता जंक्शनकडे येणारी वाहने.

SPPU Ganeshkhind Road
Nashik : नमामी गोदा प्रकल्पात मोठी अपडेट; 'हे' काम सुरू

सोलापूर रस्त्यावरून हडपसर मार्गे येणारी व पुणे शहरातील मध्यवर्ती भागातून मुंबईकडे जाणारी जड वाहतूक, मालवाहतूक, भाजीपाला/तरकारी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागातून जाण्यास मनाई केली आहे.


पर्यायी मार्ग : हडपसर गाडीतळ, डावीकडे वळून सासवड रोड, मंतरवाडी फाटा, कात्रज-कोंढवा रोडने खडीमशीन चौक, कात्रजमार्गे जातील.

SPPU Ganeshkhind Road
NHAI: 'या' 4 जिल्ह्यांतील 122 गावांतील जमिनीला येणार सोन्याचा भाव

नगर रस्त्याने येणारी व पुणे शहरातील मध्यवर्ती भागातून मुंबईकडे जाणारी जड व माल वाहतूक, भाजीपाला/तरकारी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागातून जाण्यास बंदी घातली आहे.

पर्यायी मार्ग : नगर रस्ता, खराडी बायपास, शास्त्रीनगर चौक, आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, जुना पुणे-मुंबई महामार्ग.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com