Pune: वाघोलीकरांसाठी गुड न्यूज! 'हा' प्रश्न मार्गी लागणार, कारण...

Wagholi
WagholiTendernama

पुणे (Pune) : वाघोलीतील (Wagholi) नागरिक पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी झगडत असताना, या भागाला समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी देण्यासाठी DPR तयार केला आहे. यामध्ये वाघोलीसह लोहगावचा समावेश आहे. या दोन्ही गावांना भामा-आसखेड धरणातून पाणी उपलब्ध केले जाणार असून, २८१ कोटींचा खर्च येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Wagholi
EXCLUSIVE: महानिर्मितीत लाखोंची उधळपट्टी; बैठकीच्या नावाखाली चुना

पुणे महापालिकेत २०२१ मध्ये वाघोली गावाचा समावेश झाला आहे. या भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक मोठे बांधकाम प्रकल्प झाले असले, तरी तेथील नागरिक पाणी, रस्ता यासह पायाभूत सुविधांसाठी झगडत आहेत.

पूर्वी ग्रामपंचायतीकडून पाणी दिले जात होते, पण तो अपुरा असल्याने येथील नागरिक टँकरवर अवलंबून आहेत. त्यामध्ये त्यांची लूट होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत.

Wagholi
Pune: 2 वर्षांत जे जमले नाही ते PWDला आता जमणार का?

महापालिकेने समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे काम केले आहे. यामध्ये वाघोली आणि लोहगाव (उर्वरित) दोन गावांसाठी २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून एकत्रित पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. यासाठी भामा-आसखेड धरणातून दररोज ५९ एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या योजनेसाठी २८१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असून, त्याचा प्रस्ताव पूर्वगणन समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर टेंडर प्रक्रिया राबवली जाईल, असे कुमार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com