Pune : खान्देश अन् विदर्भातून मुंबई, पुण्याला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खुश खबर

Indian Railway
Indian RailwayTendernama

पुणे (Pune) : मुंबई ते धुळे नवीन ट्रेन चालवण्याची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबरपासून ही गाडी सुरू करण्यात आली आहे. तसेच पुणे भुसावळ एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरपासून दौंड कॉर्ड लाईन मार्गे, अहमदनगर आणि मनमाडमार्गे अमरावतीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई ते धुळे आणि पुणे ते अमरावती दरम्यान प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

Indian Railway
Nashik : इमारत बांधकाम सुरू होताच महापालिका आकारतेय घरपट्टीही

ट्रेन क्रमांक ११०२५ / ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेसचा विस्तार १३ नोव्हेंबरपासून अमरावतीपर्यंत दौंड कॉर्ड लाइनमार्गे, अहमदनगर आणि मनमाडमार्गे वळवून करण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक ११०११/ ११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे एक्स्प्रेस ही नवीन ट्रेन देखील सुरू करण्यात येत आहे.

Indian Railway
मंत्र्यांच्या मुलाच्या लग्नासाठी भूमिगत गटारीचा 'डाव' नागरिकांनी का उधळला?

ट्रेन क्रमांक ११०२५ पुणे - अमरावती एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, ती पुणे येथून सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.५५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ११०२६ अमरावती-पुणे एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, अमरावती येथून रात्री १०. ५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचेल.

ही गाडी दोन्ही दिशेने उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, बडनेरा स्थानकावर थांबणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com