Pune : Good News! प्रवास सुखद करण्यासाठी PMP कडून आणखी एक पाऊल...

PMPML Bus
PMPML BusTendernama

पुणे (Pune) : पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) लवकरच स्वमालकीच्या शंभर सीएनजी बस (CNG Bus) घेणार आहे.

PMPML Bus
Nagpur : नागपूर शहरापासून 80 किमीवर उभे राहतेय एक नवे आश्चर्य! लवकरच उद्घाटन

गुरुवारी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत याला मान्यता मिळाली असून, पुढील आठवड्यात याच्या टेंडर प्रक्रियेला देखील सुरवात होईल. १२ मीटर लांबीच्या या बस असतील. प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यास किमान पाच ते सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

‘पीएमपी’च्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पार पडली. सुमारे १५ विषय चर्चेला आले. या वेळी स्वमालकीच्या १०० बस घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बस असल्याने त्या उपलब्ध होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सध्या ई-बसच्या पुरवठ्यासंदर्भात अडचणी येत असून, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ‘पीएमपी’ ई-बसच्या प्रतीक्षेत आहे.

ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, म्हणून पीएमपी प्रशासनाने ‘सीएनजी’ बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा पीएमपी व प्रवाशांना होणार आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळे बसची उपलब्धता वाढविणे आता अपरिहार्य आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

PMPML Bus
Ajit Pawar : नाशिक जिल्ह्यातील तहानलेल्या 'या' 2 तालुक्यांचे प्रश्न मार्गी लागणार का?

वाढती ताकद

‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या सध्या ९८१, तर सात ठेकेदारांच्या मिळून १०९८ बस आहेत. नव्या १०० सीएनजी बस दाखल झाल्यावर ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या बसची संख्या वाढून १०८१ होईल. यामुळे निश्चितच ताकद वाढणार आहे. ठेकेदारांवरचे अवलंबित्व जेवढे कमी असेल, तेवढाच ‘पीएमपी’ला फायदा होणार आहे.

७३ हजार प्रवाशांची सोय

‘सीएनजी’च्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. १०० नव्या बस आल्यावर दिवसाला किमान ७३ हजार प्रवाशांना सेवा मिळेल. यामुळे प्रवासी संख्या वाढेल. विविध मार्गांवरच्या बसमध्ये प्रवाशांना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागतो. मात्र नव्या बसमुळे प्रवासी बसून प्रवास करू शकतील.

हे झाले निर्णय

- ४५ कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली निलंबन व बडतर्फीची कारवाई योग्य ठरविण्यात आली

- ‘पीएमआरडीए’ क्षेत्रात प्रवाशांना दैनिक व मासिक पास देणार

- डिझेल बसचे ‘सीएनजी’त रूपांतर करण्यासाठी अहवाल देण्याची सूचना

PMPML Bus
Nashik ZP : सीईओ मित्तल यांच्याविरोधात ठेकेदार आक्रमक, काय आहे कारण...

‘पीएमपी’ स्वमालकीच्या १०० बस घेण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्याच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात होईल. यासह अन्य काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

- सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com