Pune: कोणी बस देता का बस! PMC, PCMCला ऐकू येईना PMPLचा टाहो

PMPML Bus
PMPML BusTendernama

पुणे (Pune) : गेली दोन वर्षे पाठपुरावा सुरू असूनही PMPML प्रशासनाला पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांकडून नवीन बस मिळत नाहीत. त्यामुळे ‘स्क्रॅप’च्या स्थितीत आलेल्या बसची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

PMPML Bus
Nashik : अनेक वर्षे प्रलंबित सटाणा बायपाससाठी अखेर 135 कोटी मंजूर

सध्या शहरात रोज १६८४ बसेस धावतात. त्यापैकी तब्बल ३२७ ‘स्क्रॅप’ असून येत्या काही महिन्यांत आणखी २६६ बसेस स्क्रॅप होणार आहेत. तरीही अशा धोकादायक स्थितीतील बसमधून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवाशांची वाहतूक होत आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांनी पीएमपीला तत्काळ बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसांत पीएमपी बसचे ब्रेकडाउनचे प्रमाण वाढत आहे. अर्ध्या वाटेतच बस रद्द होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे आयुर्मान संपलेल्या बस प्रवासी सेवेसाठी धावत आहेत. पीएमपीमध्ये एखाद्या बसचे १० वर्षे आयुर्मान पूर्ण होताच, ती स्क्रॅप केली जाते. मात्र, १२ वर्षे होऊनही ३२७ बसेस सद्य स्थितीत धावत आहे. तर २६६ बसेसला १० वर्षे पूर्ण होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. याच बस सर्वांत जास्त वेळा ब्रेकडाउन होत आहेत. पीएमपीच्या ताफ्यातील अवघ्या १००० बसच सध्या सुस्थितीत आहेत.

PMPML Bus
Good News! Pune महापालिकेत समाविष्ट 23 गावांनाही मिळणार 'ती' सवलत

बसची मागणी केली; पण ...
पीएमपीएमएल प्रशासन पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडे दोन वर्षांपासून ३०० सीएनजी व १०० इलेक्ट्रिक बसची मागणी करीत आहे. दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने यापैकी २०० सीएनजी व १०० इलेक्ट्रिक बसला मान्यता दिली. मात्र, अद्याप एकही बस पीएमपीला मिळालेली नाही. तातडीने नव्या बस मिळाल्या नाहीत तर प्रवासी सेवा कोलमडण्याची भीती आहे. कारण, लवकरच आणखी २६६ बस स्क्रॅप होणार आहेत. त्यामुळे स्क्रॅप बसेसची संख्या तब्बल सहाशेच्या आसपास जाणार आहे.

तीन महिन्यांत २,८९१ बसचे ब्रेकडाउन
अनेक स्क्रॅप बस धावत असल्याने ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यांत पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या व ठेकेदारांच्या मिळून २८९१ बस ब्रेकडाउन झाल्या आहेत. म्हणजे रोज सुमारे ३२ ते ३५ बस ब्रेकडाउन होऊन प्रवासी सेवेतून बाद होत आहेत. याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे.

PMPML Bus
Good News : नागपूर महापालिकेत बंपर भरती; तब्बल 'एवढ्या' जागांसाठी

टर्मिनेट होण्याचे प्रमाण वाढले
एखादी बस महिन्यात पाच वेळा बंद पडली तर ती सेवेतून तात्पुरती बाद केली जाते. याची संख्या वाढत आहे. बस बाद झाल्यास तिला पुन्हा प्रवासीसेवेत येण्यासाठी १५ दिवस ते महिन्याचा कालावधी लागतो. तो पर्यत ती बस प्रवासी सेवेतून बाहेर असल्याने याचा परिणाम प्रवासी सेवेवर होताना दिसून येत आहे. प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करण्यासाठी देखील जागा नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

२,०७९
- पीएमपीची संख्या

१६८४
- रस्त्यांवर धावणाऱ्या बस

सुमारे १२ लाख
- दैनंदिन प्रवासी

१ कोटी ३० लाख
- प्रवासी उत्पन्न


PMPML Bus
Pune: जेव्हा रेल्वेच प्रवाशांची फसवणूक करते तेव्हा...

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडे नवीन बसची मागणी केली आहे. मात्र, अद्याप नव्या बससाठी आवश्यक तो निधी मिळालेला नाही. नवीन बस उपलब्ध झाल्या तर प्रवासी सेवा आणखी सुधारेल.
- प्रज्ञा पवार, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com