Pune : आयुक्त साहेब, पालिकेचा फायदा बघा; बॅंकांचा नको! काय आहे प्रकरण?

Vikram Kumar, PMC
Vikram Kumar, PMCTendernama

पुणे (Pune) : महापालिकेने (PMC) शहरातील विविध बँकांमध्ये २२०० कोटी रुपये तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये ७५५ कोटी रुपये गुंतविलेले आहेत. तीन हजार कोटींच्या ठेवी पडून असताना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ५३० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे कारण काय, असा प्रश्‍न उपस्थित करत बँकांकडून महागड्या व्याजदराने कर्ज घेऊन पुणेकरांचे नुकसान करू नये, अशी मागणी सजग नागरिक मंचाने आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

Vikram Kumar, PMC
Vijay Wadettiwar : कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्यांवर 8 हजार कोटींची मेहेरनजर

महापालिकेने समाविष्ट २३ गावांतील सांडपाणी व्यवस्थापनासाठी १३८४ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात ५३० कोटी रुपयांचे काम केले जाणार असल्याने तेवढ्या रकमेचे कर्ज काढण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यावर सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी हरकत घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com