Pune Metro देणार गुड न्यूज! 2 वर्षांत असे विस्तारणार मेट्रोचे जाळे

Narendra Modi यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे झाले होते उद्घाटन
Metro Pune
Metro PuneTendernama

पुणे (Pune) : पुणे शहर (Pune City) आणि परिसरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) सोडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या मेट्रो (Metro) प्रकल्पाचा विस्तार आता केवळ शहरातच नव्हे, तर उपनगरांतही होणार आहे. त्यातील ५६ किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्णत्वाला येणार आहेत. तर, शहर आणि उपनगरांमधील मेट्रोचा विस्तार त्यादरम्यान सुरू होणार आहे. त्यामुळे अल्पावधीतच पुण्याची ओळख ‘मेट्रो सिटी’ (Metro City) होऊ शकते.

Metro Pune
Nagpur : गडकरीजी अजबच! वाहतूक सुरू होताच सिमेंट रस्त्यावर खड्डे

सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात मेट्रो हा परवलीचा शब्द झाला आहे. इंग्लंड, अमेरिकेत हा प्रयोग यशस्वी झाला. देशातही कोलकता आणि त्यानंतर दिल्लीत मेट्रोचे काम सुरू झाले. तेथील मेट्रो आता यशस्वी झाली आहे. मुंबई, नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईसह देशातील १७ प्रमुख शहरांत मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. अनेक वर्षे चर्चा झाल्यावर शहरात मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते डिसेंबर २०१६ मध्ये झाले आणि ५ मार्च २०२२ रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यातील मेट्रो धावण्यासही प्रारंभ झाला.

पाठोपाठ आता येत्या महिनाभरात दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावण्यास प्रारंभ होईल, तर पुढील वर्षात जूनअखेर प्रकल्पाचे कामही पूर्ण होणार आहे. त्यावेळी दोन्ही शहरांतून दररोज पाच लाख प्रवाशांची मेट्रोतून वाहतूक करण्याची क्षमता असेल.

Metro Pune
Pune Traffic कोंडी फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

दोन्ही शहरांत तीन मार्गांवर पहिल्या टप्प्यात मेट्रो धावणार असली, तरी तिच्या विस्तारीकरणाचे टप्पेही निश्चित केले आहेत. त्यामुळे उपनगरे आणि शहराचा मध्यभाग जोडला जाणार आहे. तसेच शहराच्या उपनगरांतून वर्तुळाकृती रिंगरोडही मेट्रो निओच्या माध्यमातून कनेक्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याच्या मेट्रोला दिल्लीसारखा प्रतिसाद मिळू शकतो. शहराची वाढ होतच राहणार आहे, हे गृहित धरून आगामी २५ वर्षांत वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गृहितावर आधारित मेट्रोचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुढील काळात मार्गांचेही विस्तारीकरण शक्य होणार आहे.

मेट्रोचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रशासकीय नियोजन आता अंतिम टप्प्यात आले आहे. पीएमपीच्या बस, रिक्षा, कॅब आदींचा त्यात अंतर्भाव असेल. तसेच प्रवाशांना मेट्रो, पीएमपीसाठी एकाच मोबिलिटी कार्डद्वारे दोन्ही शहरांत प्रवास करता येईल. मेट्रो मार्गांभोवती रहिवाशांची घनता वाढावी यासाठी स्थानकांपासून एक किलोमीटर परिघात चौपट बांधकामासाठी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्यातून शहरातील घरांची संख्याही वाढू शकेल.

मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील शिक्षण, उत्पादन, सेवा, उद्योग क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. त्यातून दळणवळण सुलभ होतानाच नागरिकांची क्रयशक्ती वाढून त्यांचे राहणीमानही उंचावू शकेल, असे मेट्रो प्रकल्पातून अपेक्षित आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्यावर खासगी वाहनांची संख्या कमी झाल्यावर शहरातील पर्यावरणाचा प्रश्नही नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पातून नव्या पुण्याची ओळख होऊ शकेल.

Metro Pune
Surat-Chennai Highway मोठी बातमी; फेब्रुवारीपासून भूसंपादन

मेट्रोला दिल्लीसारखा पुण्यातही प्रतिसाद मिळू शकतो. परंतु, त्यासाठी झालेल्या प्रकल्प अहवालानुसार नेटकी अंमलबजावणी व्हायला हवी. त्यातून नागरिक मेट्रोकडे आकर्षित होतील. सार्वजनिक वाहतुकीची सुविधा पुरविणाऱ्या बस, रिक्षा, कॅब यांची मेट्रोबरोबर सांगड घालावी लागेल. नागरिक घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी कामाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी ही सार्वजनिक वाहतुकीची सुविधा द्यायला हवी. तसेच विद्यार्थ्यांना मोफत किंवा सवलतीत मेट्रो प्रवासाची सुविधा मिळाल्यास त्यांचा प्रतिसाद वाढेल.

- प्रतापसिंह भोसले, अर्बन ट्रॅफिक इंजिनिअर

Metro Pune
Davos 2023 : जर्मनीची 'ही' कंपनी राज्यात करणार 300 कोटीची गुंतवणूक

मेट्रो प्रकल्प हा शहरातील वाहतुकीचे चित्र बदलणारा आहे. परंतु, त्यात शेवटच्या घटकापर्यंत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा (लास्ट माईल कनेक्टिव्हिटी) पुरविणे गरजेचे आहे. त्याचा प्रकल्पात अंतर्भाव असू शकतो. त्यामुळे त्याबाबत जागरूकता निर्माण झाली, तर खासगी वाहनांची संख्या कमी होऊन शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर उत्तर सापडू शकेल.

- अरुणा ठुबे, सहयोगी प्राध्यापक, समन्वयक-वाहतूक अभियांत्रिकी विभाग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

Metro Pune
Fadnavis-Shinde सरकारचे पुन्हा 2.0; अपयशी ठरलेली 'ही' योजना आता...

परदेशी गुंतवणूक येण्यासाठी विमानतळ, मेट्रो, स्मार्ट सिटी हे मापदंड आहेत. या बाबी शहरात असतील, तर त्याकडे पाहण्याचा जागतिक दृष्टिकोन बदलतो. त्याचा फायदा उत्पादन, सेवा, बांधकाम आणि पूरक क्षेत्राला होतो. निश्चित वेळेची सार्वजनिक वाहतूक ही विकसनशील शहरासाठी आवश्यक असते. त्यामुळे मेट्रोसारख्या प्रकल्पांमुळे केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर संपूर्ण शहराच्या विकासाला गती मिळते.

- शांतिलाल कटारिया, उपाध्यक्ष, क्रेडाई नॅशनल

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com