Pune : मोठी बातमी; पुण्याजवळ होणार आणखी एक महानगरपालिका; काय आहे प्लॅन?
पुणे (Pune) : खेड तालुक्यातील चाकण, आळंदी व राजगुरुनगर या तीनही नगर परिषद आणि त्यांच्या लगतची गावे मिळून एक महापालिका करण्यासाठी सरकारच्या विचाराधिन आहे.
यासाठी लोकसंख्या आणि क्षेत्रफळाबाबतचा सविस्तर अहवाल पाठविण्याबाबतचा आदेश पुणे प्रशासनास महाराष्ट्र सरकारचे उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी बुधवारी (ता. २४) दिले.
याबाबतचा पत्रव्यवहार पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तीनही नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना केला आहे.
पुणे जिल्ह्यात लोकसंख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे राजगुरुनगर, आळंदी चाकण या ठिकाणचे शहरीकरण वेगाने होत आहे. यापूर्वी पुणे व पिंपरी महापालिकांची हद्दवाढ झाली. आता आणखी जादांची गावे या दोनही महापालिकेत समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे चाकण, आळंदी राजगुरुनगर आणि त्यांच्या परिसरातील गावे मिळून महापालिका करण्याचा विचार सरकार करत आहे.