Pune : अजितदादा, विद्यापीठ चौकातील कोंडी कधी फुटणार?

Traffic
TrafficTendernama

पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्यावरील (Ganeshkhind Road) वाहतुकीची समस्या वाढत असल्याने कृषी महाविद्यालयातील पर्यायी रस्त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्‍यता आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आदेशानंतर कृषी महाविद्यालयानेही रस्त्यासाठी तत्वताः मान्यता दिली आहे.

Traffic
फडणवीसांची मोठी घोषणा; आता विदर्भातील 'या' शहरातही होणार विमानतळ

आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), कृषी महाविद्यालय, महापालिका व वाहतूक शाखा अशा विविध विभागांच्या पातळीवर तांत्रिक प्रक्रियेला गती देण्यास सुरवात झाली आहे.

मेट्रो प्रकल्प, बहुमजली उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरण अशा वेगवेगळ्या कामांमुळे गणेशखिंड रस्ता, आनंद ऋषीजी महाराज चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी कृषी महाविद्यालयातील रस्ता तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी रस्ता म्हणून वापरण्याचा पर्याय सुचविण्यात आला होता.

Traffic
'त्या' एमआयडीसीच्या जागेच्या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब

दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांनी हा पर्यायी रस्ता खुला करण्याचा आदेश पीएमआरडीए, महापालिका, कृषी महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये दिला आहे. रस्ता तयार करण्याची जबाबदारी ‘पीएमआरडीए’कडे असून, कृषी महाविद्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात येईल.

कृषी महाविद्यालयातील रस्ता सहा मीटर इतका आहे, मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने हा रस्ता आणखी रुंद करावा लागणार आहे. रस्ता दुरुस्तीसह डांबरीकरण करावे लागणार आहे. अधिकाऱ्यांकडून संबंधित रस्त्याची पाहणी करून पुढील प्रक्रिया करण्यात येईल. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘पीएमआरडीए’ रस्त्याचे काम सुरू करेल.

Traffic
Pune : पुण्यात सिंहगड रस्त्यावर लहान गतीरोधकामुळे काय झालेय पहा!

असा असेल पर्यायी रस्ता

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरून औंध, बोपोडी, सांगवी, पिंपरी - चिंचवडकडे जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांना कृषी महाविद्यालयातील म्हसोबा गेट ते सिंचननगर, तेथून पुढे खडकी, बोपोडी (स्पायसर महाविद्यालय रस्ता) येथे जाणे सोईस्कर ठरणार आहे. सकाळी सात ते रात्री दहा यावेळेत हा रस्ता सुरू राहील.

Traffic
Nashik : 333 स्पीडब्रेकर्स बसविण्यास सुरवात; फेब्रुवारीत 50 बसविणार

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सुटणे आवश्‍यक आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातून तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी रस्ता देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यानुसार, त्यांनी तात्पुरत्या रस्त्यासाठी तत्वताः मान्यता दिली आहे. ‘पीएमआरडीए’च्या सहकार्याने पुढील प्रक्रियेला गती दिली जाईल.

- डॉ. विठ्ठल शिर्के, कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

कृषी महाविद्यालयातील पर्यायी रस्त्यामुळे बरीच वाहने औंध, खडकी, बोपोडीला थेट जाऊ शकतील. कृषी महाविद्यालयासमवेतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्याचे काम ‘पीएमआरडीए’कडून सुरू करण्यात येईल.

- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com