Pune Airport
Pune Airport Tendernama

Pune Airport : तो एक फोन अन् विमान प्रवाशांना सहन करावा लागला मनस्ताप

Published on

पुणे (Pune) : देशातील विविध भागांतील विमानसेवेला गुरुवारी (ता. २४) मोठा फटका बसला. गुरुवारी देशांतर्गत प्रवास करणाऱ्या ८५ विमानांत बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश ‘एक्स’वर पोस्ट करण्यात आला. यात पुणे-जोधपूर, पुणे-कोलकत्ता व कोलकत्ता-पुणे विमानाचा समावेश होता.

Pune Airport
Pune : रिंगरोडच्या दोन्ही बाजूच्या एक किमी अंतरातील गावांच्या विकासाचे अधिकार सरकारने दिले 'यांना'

कोलकत्ता-पुणे हे विमान दाखल होताच विमानाला ‘आयसोलेशन बे’वर नेले. प्रवाशांना खाली उतरवून प्रवाशांसह संपूर्ण विमानाची सीआयएसएफ व बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून तपासणी करण्यात आली. तर पुणे-जोधपूर व पुणे-कोलकत्ता हे हवेत असल्याने ते आपापल्या निर्धारीत स्थानी पोचल्यावर तपासणी करण्यात आली.

सर्वच विमानात बॉम्ब न आढळल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले, मात्र यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पुणे-जोधपूर व कोलकत्ता-पुणे ही इंडिगो एअर लाईन्सची विमाने होती तर पुणे-कोलकत्ता हे अकासा एअर लाइनचे विमान होते.

Pune Airport
नगरला जोडणाऱ्या 'त्या' रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणासाठी 320 कोटींचे टेंडर

बॉम्बच्या सततच्या धमकीमुळे विमानतळ प्रशासन, सुरक्षा यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे. तर दुसरीकडे प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागच्या गुरुवारीदेखील लखनौवरून पुण्याला येणाऱ्या विमानात बॉम्बच्या धमकीचा संदेश ‘एक्स’वर पोस्ट करण्यात आला होता.

त्यानंतर पुन्हा सिंगापूर-पुणे आंतरराष्ट्रीय विमानातदेखील बॉम्ब असल्याचे म्हटले होते. मात्र पुण्यासह देशात कुठेही बॉम्ब आढळून आला नाही. मात्र अफवेमुळे विमान भारतीय हवाई क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

Tendernama
www.tendernama.com