Pune Airport वर 'वाट बघतोय पार्किंगवाला'! 120 कोटीचा खर्च पाण्यात?

Pune Airport
Pune AirportTendernama

पुणे (Pune) : पुणे विमानतळावर (Pune Airport) प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांच्या सोयीसाठी तसेच परिसरात वाहतूक कोंडीचा (Traffic) प्रश्न सुटावा म्हणून विमानतळ प्रशासनाने मल्टीलेव्हल कार पार्किंगची (Multilevel Car Parking) इमारत बांधली. यासाठी १२० कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र, त्याला वाहनधारकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. वाहने पार्किंगसाठी इमारतीचा वापर होत नसल्याने या निर्णयावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Pune Airport
Davos: नाशकात 'ही' कंपनी करणार मोठी गुंतवणूक; तब्बल 2 हजार रोजगार

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्या हस्ते २५ नोव्हेंबर या एरोमॉलचे (Aero Moll) उद्‍घाटन झाले. दोन महिन्यांत याला प्रतिसाद लाभला नाही.

का बांधली होती इमारत?
- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे
- या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची संख्या देखील जास्त आहे
- पूर्वी वाहन तळ छोटे होते. त्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे लावली जात.
- परिणामी परिसरात वाहतूक कोंडी होत होती
- या भागात येणाऱ्या वाहनांना पार्किंगची सोय निर्माण करण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून एरोमॉल मल्टीलेव्हल पार्किंगचा निर्णय
- १२० कोटी रुपये खर्चून इमारतीची उभारणी
- तीन लाख स्केअर फूट जागेचा वापर केवळ पार्किंगसाठी

Pune Airport
High Court:बीडबायपास पुलाच्या अभियंत्यांना कोणता पुरस्कार द्यायचा?

क्षमता किती-वापर किती?
- एक हजार दुचाकी व एक हजार चारचाकी पार्किंगची क्षमता
- सध्या दिवसाला सध्या केवळ १०० ते १२० चारचाकी आणि १५० ते १६० दुचाकींचे पार्किंग
- कर्मचाऱ्यांचीच १०० हून अधिक वाहने पार्किंग केली जातात
- पार्किंगसाठी दुचाकीचा दोन तासाला १५ रुपये, तर चारचाकीला ५० रुपये

Pune Airport
Nashik: 10 हजार कोटींतून साकारणार 60 किमीचा बाह्यरिंगरोड प्रकल्प

वाहनधारकांच्या सोयीसाठी चांगल्या दर्जाचे मल्टिलेव्हल पार्किंग बांधले. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अनेक जण अजूनही रस्त्यावरच पार्किंग करीत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com