Pune : 'त्या' कारवाईच्या भीतीने ठेकेदाराचा इमारतीवरून पडून मृत्यू

Police
PoliceTendernama

पुणे (Pune) : बेकायदा धंद्यावर पोलिस कारवाईच्या भीतीने पसार होण्याच्या तयारीत असलेल्या बांधकाम ठेकेदाराचा (Contractor) इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावर वडगाव बुद्रूक परिसरात घडली.

Police
MHADA : गोरेगावातील म्हाडाच्या तारांकित घरांच्या किमती किती असणार?

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. विश्वनाथ गुंडाप्पा बिरेदार (वय ४७, रा. वडगाव बुद्रूक, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. वडगाव बुद्रूक परिसरातील चरवड वस्ती भागात असलेल्या एका इमारतीत शुक्रवारी रात्री काही जण पत्ते खेळत होते. त्याच दिवशी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बेकायदा धंदे आणि सराइतांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली.

येरवड्यासह शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्या वेळी चरवड वस्ती भागातील एका इमारतीत काही जण पत्ते खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी परिसरातील काही जणांची चौकशी सुरू केली. त्या वेळी एकजण ‘पोलिस आले’ असे ओरडला. त्यानंतर पोलिसांनी इमारतीकडे धाव घेतली.

Police
Naredra Modi : मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक धावणार बुलेट ट्रेन

इमारतीत पोलिस पोहोचले तेव्हा दोघांनी तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी इमारतीत सहा ते सात जण होते. एक जण इमारतीतील पाइप पकडून खाली उतरला. बिरेदारही देखील पाइप धरून उतरण्याचा प्रयत्नात होते. मात्र खाली उतरत असताना ते चौथ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com