Pune : '5 Star' मिळविणाऱ्या पुण्याला '7 Star' करण्यासाठी महापालिकेला हवेत 95 कोटी

pune
puneTendernama

पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Swach Bharat Mission) ‘शहर घन कचरा कृती योजने’साठी (सिटी सॉलिड वेस्ट अॅक्शन प्लॅन) केंद्र सरकारकडे ९५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. यात कचरा व्यवस्थापन, बायोमायनिंग ही कामे केली जाणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

pune
Nashik : MIDC आहे की रियलइस्टेट कंपनी? सिन्नर-माळेगावच्या भूखंड दरावरून...

केंद्र सरकारतर्फे झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराचा यंदा एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये १०वा तर १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरात नववा क्रमांक आला आहे. गेल्यावर्षी एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरात पुणे २०व्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा क्रमांक सुधारला आहे, असे खेमनार यांनी सांगितले.

pune
Pune : मोठी बातमी! 'या' निबंधक कार्यालयातील नवीन दस्तनोंदणी राहणार बंद; कारण...

पुढील वर्षी यापेक्षा चांगली कामगिरी होईल, असे सांगत खेमनार म्हणाले, ‘‘स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकषांमध्ये दर वर्षी काही ना काही बदल केले जात आहेत. सध्या कचरा व्यवस्थापनासह सांडपाणी व्यवस्थापन, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा किमान ३० टक्के पुनर्वापर अशा बाबींना महत्त्व दिले जात आहे. यामध्ये ज्या शहरांनी कामे केली आहेत, त्यांचे मानांकन पुण्यापेक्षा जास्त आहे.

पुण्याला यंदा फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. सेव्हन स्टार रँकींगसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, त्याचा पुनर्वापर वाढविणे यावर भर द्यावा लागणार आहे. महापालिकेतर्फे सध्या हे प्रकल्प राबविले जात असून, ते पूर्ण झाल्यानंतर रॅकिंगसाठी आपण पात्र होऊ.’’

pune
Nashik : 'त्या' 2 महिला सरपंचांच्या मालमत्तेवर का आली टाच? ग्रामसेवकालाही दणका

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट लावणे, कचऱ्याचे बायोमानिंग करणे यामध्ये महापालिका कमी पडत आहे. त्यामुळे या कामासाठी निधी मागितला आहे. त्याच प्रमाणे शहरातील वाढत्या पुर्नविकासाचे प्रमाण लक्षात घेता, बांधकामाच्या राडारोड्याची विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गुजर-निंबाळकरवाडी येथे नवीन प्रकल्प सुरू केला जाणार आहे, असे खेमनार यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com