Pune: महामेट्रो की PMRDA; आता चेंडू 'पुमटा'च्या कोर्टात

Pune Metro
Pune MetroTendernama

पुणे (Pune) : शिवाजीनगर ते लोणी काळभोर, हडपसर ते सासवड आणि खडकवासला ते खराडी या दरम्यानच्या मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) की महामेट्रोने करावे, याबाबतचा निर्णय आता ‘पुमटा’ (Pune United Metropolitan Transport Authority) घेणार आहे. या संदर्भात पुमटाची बैठक बोलविण्यात आली आहे. (PMRDA Or PUMTA)

Pune Metro
जमिनी मोजण्याच्या प्रकरणांना गती देण्यासाठी मोठा निर्णय; एवढा निधी

अशी आहे स्थिती
- पुणे शहरात हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’कडून हाती
- पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम ‘महामेट्रो’कडून हाती
- पीएमआरडीए आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचे विस्तार करण्याचा निर्णय
- त्यानुसार ‘पीएमआरडीए’कडून हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय
- खडकवाला ते खराडी २८ किलोमीटर मार्ग महामेट्रोकडून प्रस्तावित
- ‘पीएमआरडीए’च्या विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर, तर एक फाटा सासवड रोडवर
- महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा
- दोन्ही मार्गावर पुलगेट ते हडसपर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग एकत्रित असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्‍न निर्माण

Pune Metro
पुणे महापालिकेचा दणका! दोन ठेकेदार कंपन्या गोत्यात; 3 कोटींचा दंड

महामेट्रोचे म्हणणे...
माण या ठिकाणी मेट्रोसाठी कारडेपो आहे. तसेच लोणीकाळभोर या ठिकाणी देखील मेट्राच्या कार डेपोसाठी आरक्षण ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुलगेट ते हडपसर हा या मेट्रो मार्गाचे काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीएमआरडीएची आहे. तर खडकवासला येथे मेट्रोसाठी कारडेपो करण्यात येणार आहे, त्यामुळे पुलगेट ते हडपसर या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम आम्ही करतो, असे महामेट्रोचे म्हणणे आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली यावर निर्णय घेण्यासाठी मध्यंतरी ‘पुमटा’ची बैठक झाली होती.

Pune Metro
Good News! पुणे महापालिकेत नोकर भरती; 'या' संस्थेकडे जबाबदारी...

बैठकीत काय झाले?
पुलगेट ते हडपसर दरम्यान आठ किलोमीटर मार्गाचा तांत्रिक व आर्थिक अहवाल पीएमआरडीए आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे तयार करावा. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कोणाचा प्रकल्प व्यवहार्य आहे. त्यावर कोणी त्या मार्गाचे काम करावे, यावर निर्णय घेण्यात यावा, असे ठरले होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबतच्या सूचना पीएमआरडीए आणि महामेट्रोला दिल्या होत्या. त्यानुसार पीएमआरडीए आणि महामेट्रो यांची एकत्रित बैठका झाल्या. या बैठकीमध्ये तांत्रिक मुद्यावर चर्चा झाली. हे तिन्ही मार्ग करण्याची तयारी दोन्ही संस्थांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय ‘पुमटा’कडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pune Metro
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी उत्पन्न मर्यादेत अखेर 'हा' बदल

प्रस्तावित कामे
- खडकवासला-स्वारगेट-पुलगेट-हडपसर फाटा (मगरपट्टासिटी) ते खराडी हा सुमारे २८ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे.
- शिवाजीनगर-पुलगेट-हडपसर ते लोणीकाळभोर हा १९ किलोमीटर मेट्रो मार्ग पीएमआरडीएने प्रस्तावित केला आहे.
- त्यापैकी पुलगेट ते हडपसर हा आठ किलोमीटरचा मार्ग कॉमन असल्याने तो कोणी विकसित करावा, यावर निर्णय घेण्यासाठी बैठक

Pune Metro
मोठा दिलासा; 'म्हाडा'च्या 'या' महत्त्वपूर्ण योजनेसाठी मुदतवाढ...

शिवाजीनगर ते लोणीकाळभोर, हडपसर ते सासवड आणि खडकवासला ते खराडी या मार्गांबाबत पीएमआरडीए आणि महामेट्रो यांच्यात सविस्तर चर्चा झाली. दोन्ही संस्थांनी या सर्व मार्गांचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यावर अंतिम निर्णय पुमटाच्या
बैठकीत घेण्यात येणार आहे. लवकरच पुमटाची बैठक होईल.
- पीएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com