पीएमपी बसेस आता धावणार बायो सीएनजीवर; पुण्यात प्रकल्प सुरु

PMPML
PMPMLTendernama

पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) घनकचरा व्यवस्थापनाच्या वतीने ओल्या कचऱ्यापासून बायो सीएनजी (CNG) इंधन निर्मितीचा प्रकल्प सुस रोड, बाणेर येथे सुरू केला. या ठिकाणी निर्माण होणाऱ्या बायो सीएनजीपासून पीएमपीच्या बसेस धावणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्‍घाटन झाले.

PMPML
सरकार कोसळताच गडकरी फुटाळा तलावावर; काय घोषणा करणार?

पुणे शहरातील बसेस चालविण्याचे अभिनव उपक्रम ‘सिटी वेस्ट टू सिटी बस’ पुणे महापालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, मे. नोबेल एक्स्चेंज यांच्या संयुक्त संकल्पनेने राबविण्यात येत आहे.

PMPML
पुणे पालिकेला पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पावसाळ्यानंतर मुहूर्त

सीएनजी ऐवजी पुणे शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून निर्माण झालेल्या सिबिजीचा (सीबीजी) हा एक पर्यावरणपूरक दीर्घकालीन शाश्वत उपाय आणि इतर शहरांसाठी अनुकरण करण्यासाठी एक आदर्श ठरेल. तळेगावजवळील सोमाटणे येथे असलेल्या इंडियन ऑइल रिटेल आउटलेटमध्ये पीएमपीएमएलच्या बसेसला इंधन दिले जाईल. पहिल्या टप्यांत १५ बस धावतील. तर टप्याटप्याने १०० बसेस या बायो सीएनजीवर धावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहरात १२५ मे टन ओला कचरा तयार होतो. प्रकल्पाची क्षमता २०० मे टन आहे. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, पीएमपीचे अध्यक्ष, डॉ लक्ष्मीनारायण मिश्रा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सर व्यवस्थापक रवींद्र. के. आर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com