Good News: भूमी अभिलेखचा नवा प्रयोग; आता शेतसाराही भरा ऑनलाइन

mahabhumi
mahabhumiTendernama

पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (PMC) मालमत्ता कराच्या धर्तीवर आता जमीनविषयक महसूल कर अर्थात शेतसारासुद्धा ऑनलाइन (Online) भरण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यातील सुमारे ३१४ गावांत राबविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.

mahabhumi
Aurangabad: शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामातील अडथळा दूर

त्यासाठी गावांची निवड केली असून, गाव नमुन्यांची डेटा एन्ट्री करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतसारा भरण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन नोटीस बजावली जाणार आहे. तसेच हा कर ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी हा कर भरणे सोईचे होणार आहे.

mahabhumi
Big News: KDMCमध्ये 25 कोटींचा घोटाळा? ठेकेदार बोले महापालिका चाले

शेतसारा ऑनलाइन भरण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सुमारे ३१४ गावांतील गाव नमुन्यांची माहिती संगणक प्रणालीमध्ये भरण्याचे काम सुरू आहे. या सुविधेमुळे सर्व्हे नंबरनिहाय अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसाऱ्याची रक्कम किती होत आहे, थकीत कर किती आहे, याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच हा कर ऑनलाइन भरण्याची सुविधाही नागरिकांना उपलब्ध होणार आहे, असे कुळ कायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

mahabhumi
Riverfront : पाहायला अहमदाबादला जायची गरज नाही, आपल्या पुण्यातच..!

शेतसारा म्हणजे काय?
शेतसारा हा पारंपरिक कर आहे. इंग्रजांच्या काळापासून शेत जमिनीवर हा कर लावण्यात येतो. पूर्वी शेतसारा राज्याला महसूल देणारा सर्वांत महत्त्वाचा कर होता. काळानुरूप विकास होत गेला. मात्र, या कराची वसुली आजही सुरू आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते. दरवर्षी हा कर भरावा लागतो. परंतु, हा कर अत्यल्प असल्याने या कराची वसुली नियमित होत नाही.

परिणामी, कराची थकबाकी वाढते. त्यामुळे दरवर्षी नागरिकांना या कराची माहिती मिळावी, तसेच घरबसल्या हा कर भरता यावा, शासनाचा महसूल वाढावा, यासाठी ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

mahabhumi
Nashik ZP : सरपंचांच्या दबावामुळे झेडपीचा यूटर्न; आता अधिकार...

...अशी असेल सुविधा
- ‘ई-चावडी’ संगणक प्रणालीमध्ये शेतसारा ऑनलाइन भरण्याच्या सुविधेसाठी सॉफ्टवेअरचे काम सुरू
- प्रत्येक जिल्ह्यात किंवा महसूल विभागात रजिस्टर नमुना लिहिण्याच्या पद्धतीऐवजी संपूर्ण राज्यात एकच पद्धत लागू होणार
- गावांमध्ये बिगर शेतजमिनी नसल्याने शहरालगतची गावे निवडून ‘एनए’ करसुद्धा आकारण्याच्या पर्यायाची चाचणी सुरू
- तलाठ्यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन सुरू

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com