Muralidhar Mohol : मोठी बातमी! पुण्यातून थेट युरोप, अमेरिकेला विमानसेवा सुरू होणार?

Muralidhar Mohol
Muralidhar MoholTendernama

Pune Airport News पुणे : पुणे विमानतळाची (Pune Airport) धावपट्टी वाढविल्यास मोठ्या विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होऊ शकणार आहे. त्यामुळे पुण्याहून अमेरिका, युरोपसारख्या देशात थेट विमानसेवा सुरू होऊ शकते. त्या करिता धावपट्टीचे ‘ओएलएस’ सर्व्हे होणे गरजेचे आहे. या संदर्भात आज (ता. २४) नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) हे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची भेट घेऊन धावपट्टी वाढविण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत.

विमानतळाच्या धावपट्टीसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा ओएलएस (ऑब्स्टॅकल लिमिटेशन सरफेस) सर्व्हे आता पुणे विमानतळासाठी होण्याची शक्यता आहे. मोहोळ यांनी याबाबत राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी केली आहे.

Muralidhar Mohol
Mumbai News : अखेर 'तो' 131 वर्षे जुना उड्डाणपूल बंद; असा बांधणार नवा पूल

पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी व रुंदी वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला यश आलेले नाही. नुकतेच धावपट्टीसंदर्भात राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. सरकारने धावपट्टी वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

सद्यःस्थितीत धावपट्टीची लांबी दोन हजार ५३५ मीटर (८,३१६ फूट) इतकी आहे; तर रुंदी ४५ मीटर आहे. धावपट्टीच्या पूर्वेला ५०० मीटर व पश्‍चिमेला ३०० मीटर जागेची आवश्यकता आहे.

सुमारे ८०० मीटरने धावपट्टी वाढली; तर लांबी सुमारे १० हजार ९४० फूट इतकी होणार आहे. सुमारे ११ हजार फूट धावपट्टी झाल्यास मोठी विमानही पुणे विमानतळावर उतरू शकतील. जागेच्या संपादनासाठी सुमारे १६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Muralidhar Mohol
स्मार्ट प्रीपेड मीटर्स रद्द केल्याचे गाजर नको; अधिकृतपणे जाहीर करा तरच...

‘ओएलएस’ सर्व्हे म्हणजे काय?

‘ओएलएस’ म्हणजे ऑब्स्टॅकल लिमिटेशन सरफेस सर्व्हे. विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग सुरक्षितपणे होण्यासाठी सर्व्हे केला जातो. हा प्राथमिक स्तराचा सर्व्हे आहे. धावपट्टी वाढविताना अथवा नवी धावपट्टी तयार करताना सर्व्हे केला जातो. यात प्रामुख्याने विमानतळाच्या परिसरात असलेल्या इमारती, टेकडी, उंच झाडे याचा विचार केला जातो.

विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगला काही अडथळा ठरू शकतो का? याची पडताळणी केली जाते. जर कोणताही अडथळा नसेल; तर विमानसेवेला मंजुरी दिली जाते.

Muralidhar Mohol
Chandrapur News : खासदार प्रतिभा धानोरकर करणार आंदोलन; काय आहे कारण?

‘पार्किंग बे’ प्रश्नी चर्चा होणार

पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे क्रमांक-१’वर गेल्या महिन्यापासून एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान बंद अवस्थेत आहे. त्यामुळे विमानतळाचा एक पार्किंग बे अडकून पडला आहे. त्याचा फटका अन्य प्रवासी विमानांना बसला आहे. विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना उशीर होत आहे. या प्रश्नासंदर्भातही मुरलीधर मोहोळ हे राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार आहेत. अपघातग्रस्त विमान हवाई दलाच्या जागेत ठेवण्याची मागणी ते करणार आहेत.

Muralidhar Mohol
Electoral Bonds : वादग्रस्त स्मार्ट मीटर्सच्या टेंडरमध्येही 'चंदा दो, धंदा लो'! 2 कंपन्याकडून इलेक्टोरल बॉण्डद्वारे 85 कोटी

पुणे विमानतळाची धावपट्टी वाढल्यावर मोठे विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होईल. परिणामी पुण्याहून अमेरिका, युरोपसारख्या देशात विमानसेवा सुरू होऊ शकते. त्या करिता धावपट्टीचे ‘ओएलएस’ सर्व्हे होणे गरजेचे आहे.

- मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com