पीएमपीची चांदी; यामुळे एका दिवसात तब्बल 40 लाख अतिरिक्त उत्पन्न

PMP
PMPTendernama

पुणे (Pune) : रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) निमित्ताने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत पीएमपीने (PMP) गुरुवारी १८१२ बस सोडल्या होत्या. यातून एका दिवसात सुमारे १३ लाख प्रवाशांनी प्रवास केला तर यातून पीएमपीला सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. नेहमीच्या तुलनेत सुमारे तीन लाख अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केला तर यातून सुमारे चाळीस लाख जास्तीचे उत्पन्न मिळाले आहे.

PMP
शिंदे-फडणवीस जोडी येऊनही 'समृद्धी'चे लोकार्पण लांबणीवर?

रक्षाबंधनामुळे सकाळपासून पीएमपीच्या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत होता. प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पीएमपी प्रशासनाने गुरुवारी १८१२ बस रस्त्यांवर उतरविल्या. सकाळच्या सत्रात सुमारे ९० लाख रुपयांचे तर दुपारच्या सत्रात ८५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा दरम्यान ही प्रवासी वाहतूक झाली.

PMP
नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटींची चौकशीत अडकणार का माजीमंत्री?

तब्बल ३० बस ब्रेकडाऊन
गुरुवारी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पीएमपीने मोठ्या प्रमाणात बस रस्त्यावर उतरविल्या तसेच त्या बस बंद पडू नये म्हणून देखील विशेष काळजी घेण्यात आली होती. मात्र रस्त्यावरच्या खड्ड्यांचा फटका पीएमपीला बसला. गुरुवारी दिवसभरात सुमारे ३० बस ब्रेकडाऊन झाल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली.

PMP
मेट्रो 6 कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा तेव्हा नकोशी आता हवीहवीशी

पीएमपी सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. यातून १३ लाख प्रवाशांनी प्रवास केला तर उत्पन्न देखील पावणे दोन कोटी रुपये इतके झाले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अधिकारी वर्ग देखील विविध ठिकाणी फिरून वाहतुकीवर लक्ष ठेऊन होता.

- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com