Solapur News : 'त्या' वीजग्राहकांनी कसे वाचविले तब्बल 2 कोटी 21 लाख रुपये?

MSEB, Mahavitaran
MSEB, MahavitaranTendernama

Solapur News सोलापूर : ‘महावितरण’च्या गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील आतापर्यंत एक लाख ८४ हजार २२० वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला. त्यातून त्यांची तब्बल दोन कोटी २१ लाख रुपयांची वार्षिक बचत होत आहे.

MSEB, Mahavitaran
Sambhajinagar : 4 आयुक्तांना जे जमले नाही ते G Shrikant यांनी करून दाखविले!

पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत राज्यात पुणे परिमंडलाने ‘गो-ग्रीन’ योजनेत आघाडी घेतली आहे. पुणे परिमंडलातील एक लाख २३ हजार ४०३ वीजग्राहकांची योजनेच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांची वार्षिक बचत होत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार ९७७ ग्राहकांचा देखील समावेश आहे.

सातारा, बारामतीच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. वीजग्राहकांनी या योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ‘महावितरण’चे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

MSEB, Mahavitaran
Haldiram For Sale : असे काय झाले की 'हा' देशी ब्रँड विकण्याची वेळ आली?

‘गो-ग्रीन’मध्ये सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास ईमेलवरील वीजबिले संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येतात. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध असतात.

काय आहे ग्रो- ग्रीन योजना?

‘गो-ग्रीन’ योजनेअंतर्गत ग्राहकांना छापील वीजबिलाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’वर बिल पाठविले जाते. हा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपयांची सवलत मिळते. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची वीजबिलांमध्ये बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा त्वरीत लाभ घेणे आणखी शक्य झाले आहे.

MSEB, Mahavitaran
Sambhajinagar : परवानगी नसतानाही AC च्या हवेने सरकारी अधिकारी चिल!

दिवसेंदिवस पर्यावरणात प्रतिकूल बदल होत असल्याने पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ही काळाची गरज बनली आहे. वीजबिलाची सॉफ्ट कॉपी जतन करून ज्यावेळी आवश्यकता असेल तेव्हा वीजबिलाची कागदी प्रिंट काढता येते. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून गो-ग्रीन योजनेत वीजग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com