new mahabaleshwar
new mahabaleshwarTendernama

Satara : नवीन महाबळेश्वरचा DPR जनेतसमोर कधी ठेवणार?

Published on

सातारा (Satara) : नवीन महाबळेश्वर (New Mahabaleshwar) प्रकल्पाचा प्रारूप आराखडा शासनाने जनतेसमोर खुला करावा. त्यानंतर कोयना खोऱ्यातील स्थानिक जनताच नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत निर्णय घेईल, असे मत कष्टकरी, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर (Bharat Patankar) यांनी व्यक्त केले.

new mahabaleshwar
बापरे, शालेय शिक्षण खात्यात बदल्यांचे टेंडर फुटले! कोट्टीच्या कोट्टी उड्डाणे

येथील सुटा कार्यालयात नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी नागरिक व कोयना विभागातील भूमिपुत्र यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पाटणकर बोलत होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके, अस्लम तडसरकर, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, ॲड. राजेंद्र गलांडे आदी उपस्थित होते.

new mahabaleshwar
Tendernama Exclusive : मंत्री संजय राठोड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! हेराफेरी करून हडपला 500 कोटींचा भूखंड

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘राज्य शासनाने शिवसागर जलाशयाच्या काठावर नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची घोषणा केली आहे. तथापि, त्यामध्ये नेमके शासन काय करणार, त्याचा लाभ स्थानिक जनतेला कसा होणार हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. हा संभ्रम शासनाने प्रथम दूर करावा. नवीन महाबळेश्वर प्रकल्पात नेमके काय होणार, कुठे होणार, कधी होणार याबाबतची भूमिका स्पष्ट करणारा प्रारूप आराखडा जनतेसमोर मांडावा.’’

new mahabaleshwar
Solapur : पंढरपूर, लातूरसह 4 स्थानकांसाठी रेल्वेची दिली Good News; लवकरच...

या वेळी अस्लम तडसरकर, सुनील भोईटे, ॲड. राजेंद्र गलांडे, शैलेंद्र पाटील यांनीही मते मांडली. या वेळी प्रकाश साळुंखे, गोविंद शिंदकर, आनंदा सपकाळ, संतोष गोटल, विजय निकम, प्रकाश खटावकर आदी उपस्थित होते.

Tendernama
www.tendernama.com