'या' कारणांमुळे पुणे-सातारा महामार्गावर लागल्या वाहनांच्या रांगा

Khed Shivapur Toll Plaza
Khed Shivapur Toll PlazaTendernama

सातारा (Satara) : कोकण (Kokan) आणि गोव्याला (Goa) जाणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे पुणे-सातारा रस्त्यावर (Pune-Satara Highway) शनिवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. नाताळाच्या सुट्यांचा आंनद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने पुणे - सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोल नाक्यावर (Khed Shivapur Toll Plaza) वाहनांच्या सुमारे एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

Khed Shivapur Toll Plaza
नाव 'स्मार्ट सिटी' पण विकास कासवगती;पुण्याचे कारभारी अजूनही झोपेतच

रविवारची सुटी आणि त्याला जोडून आलेला नाताळाच्या सणानिमित्त सुट्यांचा आनंद घेण्यासाठी नागरीक शनिवारी मोठ्या संख्येने बाहेर पडले. अनेक जण कोकण, गोवा आदी ठिकाणी चालले आहेत. त्यामुळे शनिवारी पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. सकाळी आठ वाजल्यापासून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची पुणे-सातारा रस्त्यावर गर्दी दिसून आली.

Khed Shivapur Toll Plaza
समृद्धीवरून प्रवास करणाऱ्यांचे आठवड्यातच वाचले ५० कोटी कारण...

खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली. साताऱ्याकडे जाणाऱ्या टोल नाक्यावर शनिवारी सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत रस्त्यावर वाहनांची गर्दी कायम होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com