रक्षाबंधनातच एसटीची दिवाळी! 137 कोटींचा विक्रमी महसूल

Pratap Sarnaik: यंदाच्या आर्थिक वर्षातील विक्रमी उत्पन्न
ST Bus Stand - MSRTC
ST Bus Stand - MSRTCTendernama
Published on

मुंबई (Mumbai): यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांमध्ये प्रवाशी वाहतुकीतून एसटीला (MSRTC) १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ST Bus Stand - MSRTC
Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील 'त्या' प्रकल्पांना मिळणार सिंगापूरचा बूस्टर

विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

सरनाईक म्हणाले, दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी) या दोन दिवसांत विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण, या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी, गेली कित्येक वर्ष रक्षाबंधन सणाच्या कालावधी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे.

ST Bus Stand - MSRTC
लघुउद्योजक आहात, कर्ज हवंय मग 'ही' बातमी वाचाच...

यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३०.०६ कोटी रुपये, रक्षाबंधन दिवशी म्हणजे शनिवारी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ३३.३६ कोटी रुपये तर सोमवारी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ८ ते ११ ऑगस्ट या ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे.

रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री सरनाईक यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचेही सरनाईक यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com