Dajipur
DajipurTendernama

जिल्हा परिषदेची धर्मशाळा भाड्याने देण्यासाठी काढले टेंडर

Published on

कोल्हापूर (Kolhapur) : जिल्हा परिषदेच्या (Kolhapur Jilha Parishad) मालकीची दाजीपुर (Dajipur) ओलवण येथील धर्मशाळा बांधा, वापरा व हस्तांतरीत करा (बीओटी) या तत्वावर भाडे विकसीत करण्याचा ठराव पंचायत समितीने केला होता. त्या आधारे ही इमारत भाड्याने देण्यासाठी बांधकाम विभागाने टेंडर काढले आहे.

Dajipur
मुंबई पालिकेने काढले १६ कोटींचे टेंडर ठेकेदार म्हणतो अर्धेच बस्स!

राधानगरी तालुक्यातील दाजीपुर, ओलवण या ठिकाणी जिल्हा परिषदेची धर्मशाळा आहे. सदरची इमारत १९५३ साली दगडी बांधकामात उभारण्यात आली आहे. मूळ इमारत १२३.४८ चौ.मी. व सभोवताली असणारे जागेचे क्षेत्रफळ १९४७.३७ चौ.मी. इतके आहे. सदरची इमारत सुस्थितीत असून वापरास योग्य आहे. दुधगंगा, राधानगरी ,तुळशी या तिन्ही धरणांच्या परिसरात ही इमारत आहे. तसेच राधानगरी धरणामुळे आडविलेल्या लक्ष्मी जलाशयाचे बॅक वॉटर या परिसरात आहे. हा परिसर कोकण घाटमाथ्यावर असलेने येथे पावसाचे जास्त प्रमाण आहे. त्यामुळे येथील वातावरण नेहमीच थंड राहत असून संपूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरु असते.

Dajipur
वाळू तस्करांची समांतर यंत्रणा; सहावेळा टेंडर प्रसिद्ध करुनही...

पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेने येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. सदरची इमारत सुस्थितीत असल्याने या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळेल असा बांधकाम विभागाला विश्वास आहे. ही इमारत जिल्हा परिषद मालकीची असलेने ती भाडे तत्वावर विकसित केल्यास जिल्हा परिषदेच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडेल, तसेच येणाऱ्या पर्यटकांचीही सोय होईल या हेतुने जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

Tendernama
www.tendernama.com