Ajit Pawar : 'या' शहरातील प्रत्येक नव्या प्रशासकीय इमारतीत सौर पॅनेल बसविणार!

Ajit Pawar
Ajit PawarTendernama

बारामती (Baramati) : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बारामती उर्दू शाळेची इमारत उभारण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी (ता. 28) केली. दरम्यान या पुढील प्रत्येक प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव सादर करताना त्यात सौर पॅनेलचा समावेश करण्याचेही निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले.

Ajit Pawar
Mumbai : अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट बरोबर राज्य सरकारने का केले करार?

उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील तांदुळवाडी येथील रेल्वे अंडरपास, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ग्रंथालय, बारामती बसस्थानक नुतनीकरण, वसंतराव पवार नाटयगृह आणि शादीखाना येथील विविध विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

तांदुळवाडी येथील रेल्वे अंडरपासचे काम करतांना पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याबाबत दक्षता घ्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत ग्रंथालयाच्या इमारतीचे कामे करीत असतांना ग्रंथालयात पुरेसा सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा मिळतील यादृष्टीने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामे करावीत. बारामती बसस्थानक इमारत नूतनीकरणाची कामे करतांना पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होईल असे पेव्हर आणि फरशा बसवा. बसस्थानक परिसर स्वच्छ राहील, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

Ajit Pawar
Nitin Gadkari : नागपूर येणाऱ्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार

शादीखाना परिसराची कामे करीत असताना अल्पसंख्याक बांधवाना अधिकाधिक सुविधा मिळेल, यादृष्टीने परिसर सुशोभिकरणाची कामे करावीत. नागरिकांच्या सोईच्यादृष्टीने अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. वसंतराव पवार नाट्यगृहाची कामे करताना अत्याधुनिक दर्जाची साहित्याचा वापर करन गतीने कामे करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

बेघर नागरिकांना हक्काची पक्की घरे उपलब्ध करून देण्याबाबत नगरपरिषदेने विचार करावा. सार्वजनिक विकास कामे करतांना गाळेधारकांना तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसनाची व्यवस्था करा, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com