प्रत्येक गावाला मिळणार वेदर स्टेशन! काय केली कृषी मंत्र्यांनी घोषणा?

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
Mantralaya
MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai): फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात 'वेदर स्टेशन' बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Mantralaya
एक हजार गावांमध्ये AI आधारित अर्लट यंत्रणा; मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी 260 कोटींचा आराखडा

पालघर जिल्ह्यातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील अनियमितता, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसानभरपाई आणि प्रलंबित तक्रारींबाबत मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कृषी मंत्री बोलत होते. या बैठकीला आमदार मनीषा चौधरी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Mantralaya
ड्रोन, रोबोटस, स्वयंचलित वाहन निर्मितीला राज्याचे प्रोत्साहन; 25 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित

डहाणू आणि बोईसर येथील शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरूनही त्यांची नोंदणी पूर्ण झाली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हाधिकारी पालघर यांनी करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले. प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारण्यासाठी शासन आग्रही आहे. गावागावात हवामान केंद्र झाल्यास, निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्यक्ष झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचा आकडा आणि विम्याचे निकष यांची तंतोतंत जुळवणी करणे शक्य होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल असेही कृषी मंत्री भरणे म्हणाले.

Mantralaya
Mumbai: यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची तुंबई होणार का? 50 टक्के नालेसफाई पूर्ण, 31 मेपर्यंत 100 टक्क्यांचा 'अल्टिमेटम'

विमा कंपन्या, बँका आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापसातील समन्वय वाढवून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. कोणताही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे कडक निर्देशही कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी दिले.

Tendernama
www.tendernama.com